Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस ठरु शकतो मोठा पक्ष, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार जाणून घ्या

एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या (ABP News C-Voter) एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Exit Poll) भाजपला (BJP) धक्का बसणार आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस (Congress) सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो.

  • By साधना
Updated On: Mar 07, 2022 | 07:41 PM
exit poll image

exit poll image

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पाच राज्यांच्या मतदानाचा अखेरचा टप्पा (Assembly Election 2022) पार पडला आहे, एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या (ABP News C-Voter) एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Exit Poll) भाजपला (BJP) धक्का बसणार आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस (Congress) सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो. एबीपी आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोल नुसार भाजपला २६ ते ३२, काँग्रेसला ३२ ते ३८, आपला ० ते २ आणि इतरांना ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झालं होतं. मतदान पूर्ण झाल्यानंतरही इतर चार राज्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे आयोगाने एक्झिट पोल देण्यावर बंदी घातली होती. ७ मार्चला उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्याचं मदतान पार पडल्यानंतर एक्झिट पोल घ्यायला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये या पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे २०२४ लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानली जात आहे.

उत्तराखंडमध्ये कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि आपने अजय कोठियाल यांना दिली होती. १० मार्चला या पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

भाजपने २०१७ साली ७० पैकी ५७ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला ११ आणि इतर पक्षांना २ जागा जिंकता आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळूनही भाजपला उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी चार महिन्यात तीनवेळा मुख्यमंत्री बदलावे लागले होते. चार वर्ष त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, पण पक्षांतर्गत नाराजीमुळे रावत यांच्याऐवजी तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केलं. कोरोना व्हायरसमुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांवर बंदी घातली होती, त्यामुळे तिरथसिंग रावत मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या ६ महिन्यात त्यांना विधानसभेचं सदस्य होणं शक्य नव्हतं, त्यामुळे तिरथसिंग यांना राजीनामा द्यावा लागला. तिरथसिंग रावत यांच्यानंतर पुष्कर सिंग धामी यांना भाजपने उत्तराखंडचं मुख्यमंत्री केलं. १० मार्च ते ४ जुलै या ४ महिन्यांच्या काळात भाजपला उत्तराखंडमध्ये ३ मुख्यमंत्री बदलावे लागले.

Web Title: Uttarakhand exit polls 2022 c voter survey report nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 07:40 PM

Topics:  

  • Exit Poll
  • Uttarakhand

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.