Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badrinath Helicopter Missing: उत्तराखंडमध्ये खळबळ! बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

Badrinath Helicopter Missing: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धामहून येणारे एक हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यान हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2026 | 03:48 PM
उत्तराखंडमध्ये खळबळ! बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर बेपत्ता, लोकेशन मिळत नसल्याने वाढली चिंता

उत्तराखंडमध्ये खळबळ! बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर बेपत्ता, लोकेशन मिळत नसल्याने वाढली चिंता

Follow Us
Follow Us:
  • उत्तराखंडमध्ये खळबळ!
  • बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर बेपत्ता
  • लोकेशन मिळत नसल्याने वाढली चिंता
Badrinath Helicopter Missing: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. बद्रीनाथ धामहून येणारे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली. बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्याने आणि त्याचे लोकेशन मिळत नसल्याने स्थानिक प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (Badrinath Helicopter Missing)

बद्रीनाथ-जोशीमठदरम्यान संपर्क तुटला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बद्रीनाथ धामहून निघालेल्या हेलिकॉप्टरशी अचानक संपर्क तुटला. त्यानंतर संबंधित यंत्रणांकडून हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, बराच प्रयत्न करूनही हेलिकॉप्टरचे नेमके लोकेशन मिळत नसल्याची माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे.

E-100 च्या वाहनांना इंधन पुरवठा कसा करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

शोधासाठी आणखी दोन हेलिकॉप्टर तैनात

बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी दोन अन्य हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स संबंधित परिसरात शोधकार्य करत असून बेपत्ता हेलिकॉप्टरचे लोकेशन शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यानच्या डोंगराळ भागात शोधमोहीम राबवली जात असल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. हेलिकॉप्टरचा संपर्क नेमका कोणत्या ठिकाणी तुटला, त्यामध्ये किती प्रवासी होते आणि हेलिकॉप्टरचे शेवटचे लोकेशन काय होते, याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेलिकॉप्टर डोंगरावरील कड्यावर आदळून कोसळल्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर डोंगरावरील कड्यावर आदळून कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जोशीमठमधील चाई गावाजवळ हेलिकॉप्टरचे शेवटचे लोकेशन मिळाले होते. यानंतर एसडीएमसह बचाव आणि मदत पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. एसडीआरएफचे पथक डोंगरावर चढून शोधमोहीम राबवत आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदकिशोर जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या जंगलात पांढऱ्या रंगाच्या एखाद्या वस्तूला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची सत्यता तपासण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अन्य हेलिकॉप्टरला हवाई पाहणीसाठी पाठवण्यात आले आहे.

हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण होते

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी राज्य सरकारच्या हेलीपॅडवरून दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी ट्रान्स भारत कंपनीच्या ‘HCX’ हेलिकॉप्टरने बद्रीनाथ धामहून उड्डाण केले होते. देहरादूनमधील सहस्रधारासाठी हे हेलिकॉप्टर रवाना झाले होते. मात्र, उड्डाणानंतर अवघ्या १५ मिनिटांत हेलिकॉप्टरचा एटीसी (ATC) आणि आरटी (RT) संपर्क तुटला. त्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.

या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण सहा जण प्रवास करत होते. त्यामध्ये पायलट हिमांशू यांच्यासह प्रवासी प्रथापा, अरुण साळुंके, शंकरगौडा व्ही. जी., सुधीर के. आणि एच. एस. नागराजा यांचा समावेश होता.

देशातील 25 राज्यांना हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’; ओडिशा, आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा तडाखा

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केले दुःख

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. चाई गाव, जोशीमठजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी माहिती मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने बचावकार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण घटनाक्रमावर आपण सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गंभीर जखमींना तातडीने एअरलिफ्ट करून पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असावेत, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कुठे बेपत्ता झाल्याची माहिती आहे?

    Ans: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धाम आणि जोशीमठदरम्यान हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध कसा घेतला जात आहे?

    Ans: स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच शोधकार्यासाठी अन्य दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

  • Que: हेलिकॉप्टरचे लोकेशन मिळाले आहे का?

    Ans: हेलिकॉप्टरचे लोकेशन अद्याप मिळालेले नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Helicopter missing between badrinath and joshimath search rescue operation uttarakhand sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • helicopter
  • Uttarakhand

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.