फोटो सौजन्य: iStock
भारतात नॉर्मल बाईक्सपेक्षा हाय स्पीड बाईक्सबद्दल जास्त चर्चा होताना दिसते. या बाईक्स दिसायला तर आकर्षक असतातच पण त्यांचे परफॉर्मन्स सुद्धा पॉवरफुल असते. म्हणूनच या बाईक्स तरुणाईच्या मनात घर करून बसतात. आज आपण अशाच एका जबरस्त बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, जिची किंमत ऐकून नक्कीच तुमची झोप उडेल.
आपण सर्वांनीच लॅम्बोर्गिनी कार पाहिल्या असतील, पण तुम्हाला माहित आहे का की लॅम्बोर्गिनी कंपनी बाईक देखील बनवते. आज आआपणा Ducati Streetfighter V4 Lamborghini बद्दल जाणून घेणार आहोत. ही सामान्य मोटरसायकल नाही आहे. जर तुम्ही ही बाईक संपूर्ण ॲक्सेसरीजसह खरेदी केली तर त्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. या किंमतीत तर नक्कीच मुंबईत एक फ्लॅट विकत घेतला जाऊ शकतो.
भारतात या मोटरसायकलचे फक्त 3 युनिट्सचे वाटप करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, या बाईकचे दुसरे एकही युनिट भारतात उपलब्ध नाही आहे. आज आपण या बाईकच्या फीचर्स बादल जाणून घेऊयात.
Ducati Streetfighter V4 Lamborghini मध्ये 1,103cc Desmosedici Stradale V4 इंजिन आहे, जे अंदाजे 208 हॉर्सपॉवर आणि 123Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन मोटोजीपी तंत्रज्ञानाने प्रेरित आहे, ज्यामुळे ते स्पोर्ट्स बाईक म्हणून अत्यंत वेगवान आणि पॉवरफुल बनते.
या बाईकचे डिझाईन अतिशय आक्रमक आणि ठळक आहे, ज्यामुळे याला स्ट्रीट फायटर म्हणून अतिशय अनोखा लूक मिळतो. या बाईकचा फ्रंट लुक आणि एरोडायनामिक डिझाईन या बाईकला इतर बाईक्सपेक्षा वेगळे बनवतात.
या बाईकमध्ये अनेक प्रकारचे राइडिंग मोड (रेस, स्पोर्ट, स्ट्रीट) आहेत, जे प्रत्येक प्रकारच्या रस्त्यासाठी आणि ड्रायव्हिंग स्टाइलसाठी योग्य बनवतात. या बाईकमध्ये कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, स्लाइड कंट्रोल यासारख्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला गेला आहे, जे रायडरला सुरक्षित आणि नियंत्रित राइडिंगचा अनुभव देतात.
Ducati Streetfighter V4 लॅम्बोर्गिनी ब्रँड त्याच्या प्रीमियम फील, हाय क्वालिटी आणि कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. Streetfighter V4 हीच परंपरा पुढे घेऊन जाते आणि क्रीडा आणि सुपरबाइक सेगमेंटमध्ये नवीन उंची निर्माण करते.