फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे. तर काही कंपनीज इलेक्ट्रिक कार्समध्ये अजून कुठले अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट करू शकतो याबाबत विचार करीत आहेत. ताटात आता महिंद्रा कंपनी सुद्धा एक नवी ईव्ही मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे.
भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या दमदार कार्ससाठी ओळखली जाते. आता लवकरच कंपनी इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये आपले पाऊल ठेवले आहे. कंपनी आपली फ्युचरिस्टिक इलेक्ट्रिक एसयूव्ही सीरीज लवकरच बाजारात आणणार आहे. Mahindra BE 05 असे या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. ही कार पुढील वर्षाच्या सुरूवातीस किंवा वर्षाच्या अखेरीस सादर केली जाऊ शकते.
हे देखील वाचा: फक्त पुरस्कार नाही तर ‘या’ आलिशान कार्सवर कोरले आहे Gautam Gambhir चे नाव
Mahindra BE 05 ही स्पोर्टी कूप स्टाइल SUV आहे. सिंगल मोटर किंवा ड्युअल मोटर लेआउट BE 05 मध्ये आढळू शकते. BE 05 ला 79 kWh चा बॅटरी पॅक मिळेल. महिंद्राने त्याच्या इलेक्ट्रिक कारमध्ये ड्राइव्ह मोड साउंड तयार करण्यासाठी एआर रहमानचा देखील समावेश केला आहे.
फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात प्रीमियम 16 स्पीकर ऑडिओ सिस्टम असेल, ज्यामध्ये डॉल्बी ॲटमॉस आणि हरमन कार्डनसह नॉईज कॅन्सलेशन प्रदान केले जाईल. यात टचस्क्रीन स्क्रीन डोमिनेटेड लेआउट देखील असेल. याशिवाय फास्ट चार्जिंग, व्हेइकल-टू-लोड आणि इतर फीचर्सही या सीरिजच्या कारमध्ये पाहायला मिळतील.
एआर रहमान आणि त्यांची टीम ड्राईव्ह मोड आणि डॅशबोर्ड तसेच इतर सर्व फंक्शन्ससाठी सर्व साउंड्स संगीतबद्ध करत आहे. या महिंद्रा ईव्हीची किंमत 20 ते 25 लाख रुपये असणार आहे. BE 05 च्या उत्पादन व्हर्जनमध्ये मोठ्या C-आकाराच्या DRL सह मोठे आरसे असतील.
या कारमध्ये एक स्प्लिट रूफ माउंटेड स्पॉयलर आणि एक मोठा एलईडी लाइट बार देखील आहे, जो पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला आहे. या टेस्ट कारकडे पाहून हे स्पष्ट होते की ती बरीच लांब आहे. तसेच तिचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक रेंजमध्ये थार इलेक्ट्रिकही येणार आहे. येत्या काही वर्षांत महिंद्राची अनेक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावताना दिसतील.