Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑडी इंडियाच्या विक्रीमध्ये 97 टक्क्यांची वाढ, जानेवारी ते जून 2023 या कालावधीत झालीये ‘एवढ्या’ युनिट्सची विक्री; वाचा सविस्तर

‘मायऑडीकनेक्ट’ ॲपवर ‘चार्ज माय ऑडी’ची घोषणा केली. हे एक-थांबा सोल्यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच ॲपवर विविध इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती देते. सध्या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी 750 हून अधिक चार्ज पॉइण्ट्स उपलब्ध आहेत

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 03, 2023 | 09:43 PM
ऑडी इंडियाच्या विक्रीमध्ये 97 टक्क्यांची वाढ, जानेवारी ते जून 2023 या कालावधीत झालीये ‘एवढ्या’ युनिट्सची विक्री; वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ऑडी (Audi) या जर्मन लक्झरी कार (German luxury car) उत्पादक कंपनीने प्रबळ मागणी, लक्झरी कार विभागात विकास, विकसित होते असलेले डेमोग्राफिक्स (Demographics) आणि अनुकूल आर्थिक स्थितींच्या आधारावर प्रबळ विक्री (Sales) कामगिरी कायम ठेवली. ब्रॅण्डने जानेवारी ते जून 2023 या कालावधीमध्ये 3,474 युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 97 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

ऑडी इंडियाचे प्रमुखबलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘पुरवठ्यासंदर्भात आव्हाने आणि वाढता इनपुट खर्च असताना देखील वर्षाच्या पहिल्या सहामाहीमधील आमच्या कामगिरीने वर्षातील यशस्वी दुसऱ्या सहामाहीसाठी पाया रचला आहे. आमचे व्हॉल्यूम मॉडेल्स ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी क्यू५, ऑडी ए4 आणि ऑडी ए6 यांना प्रबळ मागणी मिळत आहे. आमच्या टॉप-ऑफ-द-लाइन कार्स ऑडी क्यू7, ऑडी क्यू8, ऑडी क्यू8 एल, ऑडी एस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू8 आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी हे देखील उत्तम आकडेवारींसह विकसित होत आहेत. आमच्या इलेक्ट्रिक श्रेणीमधील नवीन मॉडेल ऑडी क्यू८ ई-ट्रॉन लवकरच लाँच करण्यात येईल आणि आम्हाला या विभागामध्ये देखील यश मिळण्याचा आत्‍मविश्वास आहे.’’

2023 च्या पहिल्या सहामाहीत ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस (पूर्व-मालकीचा कार व्‍यवसाय) 53 टक्क्यांनी वाढला. ऑडी इंडियाने भारतातील आपला पूर्व-मालकीचा कार व्यवसाय ऑडी अप्रूव्ह्ड: प्लसचे विस्तारीकरण सुरू ठेवले आहे. सध्या देशातील सर्व प्रमुख ठिकाणी पंचवीस ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्ड विस्तार करत आहे आणि 2023 च्या अखेरपर्यंत सत्तावीस पूर्व-मालकीच्या कार सुविधा असतील.

इलेक्ट्रिफिकेशन धोरणाला अधिक पुढे नेत ऑडी इंडियाने नुकतेच ईव्ही मालकांसाठी उद्योगातील पहिला उपक्रम – ‘मायऑडीकनेक्ट’ ॲपवर ‘चार्ज माय ऑडी’ची घोषणा केली. हे एक-थांबा सोल्यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच ॲपवर विविध इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती देते. सध्या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी 750 हून अधिक चार्ज पॉइण्ट्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पुढील काही महिन्यांत अधिक भर होईल.

ऑडी इंडिया उत्पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए4, ऑडी ए6, ऑडी ए8 एल, ऑडी क्यू3, ऑडी क्यू3 स्पोर्टबॅक, ऑडी क्यू5, ऑडी क्यू7, ऑडी क्यू8, ऑडी एस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू8, ऑडी ई-ट्रॉन 50, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.

Web Title: 97 percent increase in audi india sales units sold during january june 2023 read in detail nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2023 | 09:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.