फोटो सौजन्य- iStock
तुम्हाला कार वेगात चालविण्याची सवय असेल तर ती सवय तशीही हानीकारक आहेच मात्र त्यामध्ये कारसंबंधीही अनेक धोके आहेत. हायवे आहे रस्ता खाली आहे म्हणून कार वेगात चालविली तर तुमचा अपघात होऊ शकतो. आणि याचे कारण ठरु शकते टायर फुटणे. वेगाने कार चालविल्यानंतर टायरवर त्याचा दबाव येतो आणि अशावेळी टायर फुटण्याची शक्यता प्रचंड वाढते. टायर फुटू नये याकरिताच किती वेग मर्यादेपर्यंत कार चालवावी याबद्दल जाणून घ्या.
टायरचे स्पीड रेटिंग
टायर फुटण्याची शक्यता ही मुख्यत्वे टायरची गुणवत्ता, स्थिती, रस्त्याची स्थिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेग यावर अवलंबून अशते. टायर उत्पादकांकडून टायरची रचना करताना एका विशिष्ट वेगमर्यादेपर्यंत सुरक्षित वाहन चालविण्यासाठी केली जाते. ज्यास टायरचे स्पीड रेटिंग म्हटले जाते. हे स्पीड रेटिंग टायरच्या साईड वॉलवर लिहिलेले असते. त्याद्वारे कळू शकते की टायरसाठी किती वेगमर्यादा सुरक्षित आहे.
टायर फुटण्याच्या शक्यता
ज्यावेळी तुमच्या वाहनाची वेगमर्यादा ही 120 ते 130 ताशी किमी यापेक्षा जास्त होते त्यानंतर टायरचे तापमान वेगाने वाढते. ज्याचा परिणाम टायरच्या रबरवर होतो आणि रबर कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे टायर उडण्याची शक्यता वाढते. टायरमध्ये जास्त हवा भरलेली आहे तर जास्त दाबामुळे टायरचा पृष्ठभाग पातळ होतो आणि जास्त वेगामुळे टायर फुटू शकतो. टायर जुना अथवा जीर्ण झाला असल्यास अश्या जुन्या आणि जीर्ण टायरमध्ये वेग हाताळण्याची क्षमता ही फार कमी असते त्यामुळे जास्त वेगात वाहन चालवल्यास टायर फुटू शकतो.
टायरची रेटिंग आणि वेगमर्यादा
S रेटिंग टायर : 180 किमी/ता. पर्यंत
T रेटिंग टायर: 190 किमी/ता पर्यंत
H रेटिंग टायर : 210 किमी/ता पर्यंत
V रेटिंग टायर : 240 किमी/ता पर्यंत
ही टायरची रेटिंग दिली असली तरी टायरची स्थिती आणि रस्त्याची स्थिती या बाबीही वाहन चालवताना लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे टायरची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. जास्त वेगाने वाहन चालवून तुमच्याच जीवाला धोका वाढतो आणि अपघात होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती वेग मर्यादा पाळणे केव्हाही उत्तम असते.
या’ वेगाने चालवत असाल गाडी, तर टायर फुटून होऊ शकतो अपघात ! जाणून घ्या टायरसंबंधी महत्वाची माहिती