Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी

टेस्ला भारतात दिल्ली-मुंबईनंतर अनेक शहरांत सुपरचार्जिंग नेटवर्क उभारत असून, Model Y ची डिलिव्हरी 2025 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 12, 2025 | 07:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेतील आघाडीची इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला भारतात आपली पावले झपाट्याने पुढे टाकत आहे. दिल्ली आणि मुंबई येथे शोरूम सुरू केल्यानंतर कंपनी आता देशातील अनेक मोठ्या शहरांत सुपरचार्जिंग नेटवर्क उभारण्याच्या तयारीत आहे. नुकताच भारतात औपचारिक प्रवेश करताना टेस्लाने आपली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV Model Y लाँच केली असून, या गाडीची किंमत ₹५९.८९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

डिझेल की पेट्रोलः फुल टँकमध्ये Hyundai Creta चे कोणते व्हेरिएंट देते सर्वात जास्त मायलेज

बुकिंग काही आठवड्यांपूर्वीच सुरू झाले असून सप्टेंबर २०२५ पासून डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, ग्राहकांना अधिक सोय मिळावी यासाठी कंपनी प्रथम चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करत आहे. दिल्ली एरोसिटी येथील दुसऱ्या एक्स्पिरियन्स सेंटरच्या उद्घाटनावेळी टेस्लाची रीजनल डायरेक्टर (साऊथ ईस्ट आशिया) इसाबेल फॅन यांनी सांगितले की दिल्ली आणि मुंबई या कंपनीच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर आहेत.

काही आठवड्यांत गुरुग्राममध्ये पहिले सुपरचार्जिंग स्टेशन सुरू होईल, त्यानंतर दक्षिण दिल्लीतील साकेत आणि नोएडातही सुविधा उपलब्ध होईल. मुंबईत लोअर परळ, नवी मुंबई आणि ठाणे येथे नवीन सुपरचार्जिंग पॉइंट बसवले जातील, जे विद्यमान बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) लोकेशनव्यतिरिक्त असतील. तसेच कंपनी लवकरच बेंगळुरूसारख्या नवीन बाजारपेठेतही प्रवेश करणार आहे. चार्जिंग नेटवर्क वाढवण्यासोबतच टेस्ला भारतात मोबाइल सर्व्हिस, रिमोट डायग्नॉस्टिक्स, डेडिकेटेड सर्व्हिस सेंटर आणि टेस्ला अप्रूव्ह्ड कोलिजन सेंटर सुरू करण्याची योजना आखत आहे.

सध्याच्या ऑर्डरनुसार रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) व्हेरिएंटची डिलिव्हरी २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत, तर लाँग रेंज RWD व्हेरिएंटची डिलिव्हरी चौथ्या तिमाहीत होईल. ऑर्डर टेस्लाच्या अधिकृत इंडिया वेबसाइटवर ऑनलाइन देता येईल आणि बुकिंगसाठी ₹२२,२२० चे डिपॉझिट व ₹५०,००० चे प्रशासन व सेवा शुल्क भरावे लागेल. RWD व्हेरिएंटची किंमत ₹५९.८९ लाख तर लाँग रेंज RWD व्हेरिएंटची किंमत ₹६७.८९ लाख (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.

7 लाखापेक्षा स्वस्त ढाँसू SUV ची होणार एंट्री, 24 ऑगस्टला लाँच; Punch पासून Brezza पर्यंत देणार टक्कर

जरी Model Y ची बुकिंग संपूर्ण भारतात सुरू असली तरी सुरुवातीला डिलिव्हरी मुंबई, पुणे, दिल्ली आणि गुरुग्राम येथेच दिली जाईल. मजबूत चार्जिंग आणि सर्व्हिस नेटवर्कमुळे भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात नवा वेग आणण्याचा टेस्लाचा निर्धार आहे.

Web Title: After delhi mumbai now teslas supercharging stations in these cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • elon musk
  • Tesla

संबंधित बातम्या

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास
1

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास

Silver Prices News: चांदीच्या भावांनी तोडला विक्रम; वाढत्या किमतींमुळे एलोन मस्क चिंतेत 
2

Silver Prices News: चांदीच्या भावांनी तोडला विक्रम; वाढत्या किमतींमुळे एलोन मस्क चिंतेत 

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क
3

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.