रेनॉल्ट किगर फेसलिफ्टची लाँच तारीख (फोटो सौजन्य - कारवाले)
रेनॉल्ट किगर फेसलिफ्ट वर्जन २४ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. ही भारतातील सर्वात परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींपैकी एक आहे. आता ती पूर्णपणे नवीन अवतारात लाँच होणार आहे. रेनॉल्ट किगर फेब्रुवारी २०२१ मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. आता ती नवीन कॉस्मेटिक आणि फीचर अपडेट्ससह येत आहे.
लाँच होण्यापूर्वी कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्हीची टीझर इमेज जारी केली आहे. कार कंपनीच्या टीझरमध्ये एसयूव्ही सी-आकाराचे टेललॅम्प, शार्क फिन अँटेना आणि स्पोर्टी रिअर बंपर दिसत आहेत. नवीन २०२५ रेनॉल्ट किगर कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये एक नवीन चमकदार हिरवा रंगाचा पर्याय देखील असेल. याशिवाय, अपडेटेड मॉडेलमध्ये पूर्णपणे बदललेला फ्रंट असेल, ज्यामध्ये मध्यभागी रेनॉल्टचा नवीन लोगो असलेली नवीन ग्रिल असेल. स्प्लिट हेडलॅम्प सध्याच्या मॉडेलमधून घेतले जातील. बहुतेक साइड प्रोफाइल पूर्वीसारखेच राहण्याची अपेक्षा आहे. त्यात ड्युअल-टोन डायमंड कट अलॉय व्हील्स, टेपरिंग रूफलाइन, जाड बॉडी क्लॅडिंग, रूफ रेल आणि स्क्वेअर व्हील आर्च असतील.
CNG चा पर्यायदेखील देणार
नवीन किगरमध्ये कोणतेही यांत्रिक बदल अपेक्षित नाहीत. रेनॉल्ट किगर फेसलिफ्टमध्ये पूर्वीप्रमाणेच २ पेट्रोल इंजिन पर्याय मिळतील, ज्यामध्ये १.० लिटर नॅचरली एस्पिरेटेड आणि १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. पहिले इंजिन ७२ पीएस पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क देते, तर दुसरे इंजिन १०० पीएस पॉवर आणि १६० एनएम टॉर्क देते. गियरबॉक्स पर्याय देखील पूर्वीसारखेच राहतील. ५-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक. डीलरशिप स्तरावर रेट्रोफिट म्हणून सीएनजी पर्याय देखील उपलब्ध असेल.
डिझेल की पेट्रोलः फुल टँकमध्ये Hyundai Creta चे कोणते व्हेरिएंट देते सर्वात जास्त मायलेज
इंटीरियर फीचर्स कसे असतील?
इंटीरियर डिझाइनबद्दल माहिती अद्याप उघड झालेली नाही, परंतु नवीन २०२५ रेनॉल्ट किगरमध्ये नवीन फ्रीस्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन केबिन थीम आणि सीट्सची नवीन अपहोल्स्ट्री मिळण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या मॉडेलची बहुतेक वैशिष्ट्ये त्यातच राहतील, जसे की ७-इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स, एअर फिल्टर, अॅम्बियंट लाइटिंग आणि इतर वैशिष्ट्ये.
या वाहनांशी स्पर्धा करेल
नवीन २०२५ रेनॉल्ट किगरच्या किमती सध्याच्या मॉडेलच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे, ज्याची सध्याची किंमत ६.१५ लाख ते ११.२३ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. सब-४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये, नवीन किगर निसान मॅग्नाइट, टाटा नेक्सन, महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ आणि मारुती ब्रेझा यांच्याशी स्पर्धा करेल. तुमचे बजेट जर ७ लाखाइतके असेल तर तुमच्यासाठी ही नक्कीच उपयुक्त कार ठरणार आहे आणि याचे फिचर्स अधिक चांगले ठरतील.
खरेदी करूनही आकाशदीप चालवू शकणार नाही Toyota Fortuner? गाडीची किंमत घ्या जाणून