फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट बाईक्स ऑफर करत आहे. यात विदेशी कंपन्यांचा देखील समावेश आहे. सध्या मार्केटमध्ये स्पोर्ट्स बाईक्सला चांगली मागणी मिळत आहे. म्हणूनच तर KTM सारख्या दुचाकी उत्पादक कंपनी स्पोर्टी लूक असणाऱ्या बाईक मार्केटमध्ये आणत असतात. पण आता KTM च्या बाईक्सला टक्कर देण्यासाठी लवकरच इटालियन दुचाकी उत्पादक कंपनी Aprilia नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. या बाईकचा लूक हा एवढा आकर्षक ठेवण्यात आला आहे, की नक्की पाहणाऱ्यांना त्याची भुरळ पडेल.
इटालियन ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी एप्रिलिया लवकरच भारतीय बाजारात एक नवीन बाईक लाँच करू शकते. या बाईकचे डिझाइन आणि लूक हा एकदम आकर्षिक आहे. कंपनी ही बाईक कधीपर्यंत लाँच करू शकते? यात इंजिन किती शक्तिशाली असू शकते. कोणत्या प्रकारचे फीचर्स त्यात दिले जाऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
Maruti Brezza खरेदी करण्यासाठी महिन्याला किती द्यावा लागेल EMI? डाऊन पेमेंट कसे असेल
कंपनी लवकरच भारतीय बाजारात एक नवीन बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. Tuono 457 एप्रिलियाद्वारे लाँच केली जाऊ शकते. लाँच होण्यापूर्वी टेस्टिंग दरम्यान ही बाईक अनेक वेळा दिसली आहे. याशिवाय, ही बाईक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देखील अपडेट करण्यात आली आहे.
या बाईकला 457 सीसी ट्विन-सिलेंडर इंजिन मिळू शकते जे 35 किलोवॅट पॉवर आणि सुमारे 43 एनएम पीक टॉर्क निर्माण करेल.
बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येतील. यात एलईडी लाईट्स, लहान स्पॉयलर, यूएसडी फोर्क्स, मागील मोनोशॉक सस्पेंशन, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, पाच इंचाचा डिजिटल स्पीडोमीटर, राईड बाय वायर, राईडिंगसाठी तीन मोड, ट्रॅक्शन कंट्रोल अशी वैशिष्ट्ये दिली जातील.
Audi RS Q8: ऑडीकडून ‘या’ लक्झरी कारचे बुकिंग सुरू; जाणून घ्या फीचर्स आणि कलर ऑप्शन
कंपनीकडून या बाईकच्या लाँचबाबत काही दिवसांत याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. परंतु १७ फेब्रुवारी 2025 रोजी एका कार्यक्रमात ही बाईक लाँच केली जाईल अशी अपेक्षा आहे.
या नवोन बाईकची किंमत एप्रिलिया लाँचच्या वेळी जाहीर करेल. परंतु या बाईकची किंमत सुमारे ४ लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची अपेक्षा आहे.
एप्रिलिया टुओनो 457 बाईक 450 ते 500 सीसी सेगमेंटमध्ये आणली जाईल. या सेगमेंटमध्ये, ही बाईक KTM 390, Hero Mavrick 440, Harley Davidson 440x, Triumph Speed 400 सारख्या बाइक्सशी थेट स्पर्धा करेल.