एथर कम्युनिटी डे निमित्ताने एथर एनर्जीने केले ईएल स्कूटर प्लॅटफॉर्मचे अनावरण
बंगळुरु : भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या एथर तर्फे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एथर कम्युनिटी डे 2025 मध्ये अनेक महत्त्वाची उत्पादने आणि तंत्रज्ञानासंबंधी उपक्रमांची घोषणा केली. एथर कंपनीने त्यांच्या बहुप्रतिक्षित ऑल-न्यू-ईएल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. 450 नंतरचे हे पहिले वाहन आर्किटेक्चर आहे. व्हर्सटॅलिटी, स्केलेबिलिटी आणि खर्चाचे ऑप्टिमायझेशन करण्यासाठी तयार केलेला हा ईएल प्लॅटफॉर्म अनेक विभागांमध्ये एथर स्कूटरच्या नव्या जनरेशनसाठी नवा टप्पा आहे.
एथरने ‘एथरस्टॅकटीएम 7.0’ देखील सादर केली. यात स्कूटरसोबत संवाद साधण्याकरिता संवादाचे एक नवे माध्यम म्हणून व्हॉइसचा देखील समावेश आहे. अधिक अंतर्ज्ञानी तंत्रज्ञान आणि वापरण्यास सोपे असलेले डिझाइन अशी वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत. तसेच एथरने नेक्स्ट जनरेशनच्या फास्ट चार्जरचीही घोषणा केली. यामुळे ईव्ही मालकांसाठी जलद चार्जिंग शक्य होईल. तसेच त्यांच्या उत्पादनांच्या लाइन अपमध्येही काही अपडेट्सची घोषणा करण्यात आली.
एथर एनर्जीचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता म्हणाले, “ईएल प्लॅटफॉर्मसह आम्ही एथरच्या पुढील टप्प्यातील वाढीचा पाया रचत आहोत. ज्याप्रमाणे 450 ने पहिला टप्पा गाजववला, त्याचप्रमाणे ईएल पुढील नवा अध्याय लिहील, ज्यामुळे आम्हाला आणखी कार्यक्षमतेने अनेक प्रकारच्या स्कूटर मोठ्या प्रमाणात विकसित करता येतील.
ईएल प्लॅटफॉर्म
ईएल प्लॅटफॉर्म महत्त्वाच्या घटकांचा सामान्य संच वापरून विविध प्रकारचे फॉर्म फॅक्टर तयार करण्याची सुविधा देतो. हा प्लॅटफॉर्म 26 लाख किलोमीटरच्या फील्ड डेटावर आधारीत तयार करण्यात आला आहे. यात नवीन चेसिस, पॉवरट्रेन आणि पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेला इलेक्ट्रॉनिक्स स्टॅक आहे. एथरने रेडक्स ही संकल्पना असलेली मोटो-स्कूटरदेखील सादर केली. इनसाइड आऊट दृष्टीकोनातून तयार केलेली रेडेक्स ही स्कूटर वाहन किती अंतर्ज्ञानी असू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एथर कंपनीने एथर स्टॅकटीएम 7.0 देखील सादर केले. हे कंपनीच्या मालकीच्या तंत्रज्ञान स्टॅकचा सर्वात मोठा अपग्रेड व्हर्जन आहे. यामुळे एथर स्कूटरच्या सर्व जादुई अनुभवांना शक्ती मिळते.
रायडरला सुरक्षित ठेवण्याकरिता खड्ड्यांचे अलर्ट आणि अपघाताचे अलर्ट यांसारख्या सुविधादेखील यात आहेत. तसेच चांगला मार्गही सूचवला जातो. खराब रस्त्याजवळ आल्यावर व्हॉइस नोटिफिकेशनद्वारे याची माहिती दिली जाते. अपघाताची सूचना किरकोळ आणि गंभीर अपघात कमी करू शकतात. तसेच आपत्कालीन संपर्कांना लाईव्ह लोकेशनसह आपोआप सूचना मिळते. तसेच डॅशबोर्डवर रायडरचे महत्त्वाचे तपशीलही दर्शवले जातात. एथरने 2025 च्या एथर 450 अपेक्समध्ये इनफिनिट क्रूझटीएम हे स्वतःचे प्रगत क्रूझ कंट्रोल सिस्टिम अपडेट केले आहे. हे विशेषतः भारतीय रायडिंगच्या अनुभवानुसार डिझाइन करण्यात आले आहे. रायडरने ब्रेक दाबल्यावर किंवा वेग बदलल्यावरही ते बंद होत नाही आणि नव्या वेगाशी सहजपणे जुळवून घेते.
रिझटा
एथरने रिझटा झेडसाठी एका मोठ्या अपग्रेडची घोषणा केली. याद्वारे सध्याच्या ग्राहकाला एक ओटीए अपडेट मिळेल, यामुळे स्कूटरमध्ये आधीपासूनच असलेल्या प्रगत हार्डवेअरच्या माध्यमातून पूर्ण टचस्क्रीन सुविधा सक्रीय होईल. विद्यमान मालकांना पुढील काही आठवड्यात टचस्क्रीन कार्यक्षमता आणि इको मोड सक्रिय करणारे ओटीए अपडेटदेखील मिळतील.