फोटो सौजन्य: Freepik
सध्या पावसाचे दिवस आहेत. निसर्गराजाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी भटकी मंडळी नेहमीच शनिवार-रविवारला कुठेतरी फिरायचा प्लॅन बनवत असतात. यात जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर मित्रमंडळीकडून नेहमीच लाँग ड्राईव्हची मागणी होत असते. काही वेळेस आपण त्यांची मागणी पूर्ण सुद्धा करतो आणि लाँग ड्राईव्हचा प्लॅन बनवायला सुरुवात करतो.
लाँग ड्राईव्ह ट्रीप प्लॅन करणे जेवढे सोपे असते तितकेच लाँग ड्राईव्ह करणे कठीण असते. यात खासकरून कार चालकाची खरी परीक्षा असते. जर तुम्ही सुद्धा या दर पावसाळ्यात किंवा अन्य ऋतूत लाँग ड्राईव्हचा प्लॅन करत असतात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण काही अशा ॲक्सेसरीज पाहणार आहोत, ज्यांना कारमध्ये इंस्टॉल केल्यानंतर तुमचा प्रवास अधिकच चांगला होईल.
कूल/ हॉट बॉक्स
लांबच्या प्रवासात थंड पाणी किंवा गरम अन्न ठेवण्यासाठी पोर्टेबल कूल/ हॉट बॉक्स खूप उपयुक्त ठरू शकतो. यामुळे तुमचा प्रवास आरामदायी होईल, विशेषतः जेव्हा तुम्हाला गाडी चालवताना काहीतरी थंड किंवा गरम ठेवायचे असेल.
हे देखील वाचा: कॅबमध्ये महिलांसाठी आहेत ‘ही’ सुरक्षा वैशिष्ट्ये! जाणून घ्या आणि करा निर्धास्त प्रवास
पोर्टेबल चार्जर आणि फोन होल्डर
लांबच्या प्रवासात फोनची चार्जिंग लवकर संपू शकते. त्यामुळेच पोर्टेबल चार्जर किंवा कार चार्जरसह फोन होल्डर इंस्टॉल करा जेणेकरून तुम्ही नेव्हिगेशन ॲप योग्य प्रकारे वापरू शकता आणि तुमचा फोन चार्जही होत राहील.
स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टम
तुमच्या कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम नसेल, तर ते इन्स्टॉल करून घ्या. यात नेव्हिगेशन, म्युझिक आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स आहेत जी तुमचा प्रवास मनोरंजक बनवतील.
पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट
आजच्या काळात इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट तुमचा प्रवास आणखी सोपा आणि अधिक मनोरंजक बनवू शकतो.
नेक्स्ट-जनरल डॅश कॅमेरा
डॅश कॅमेरा सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. हे केवळ तुमच्या प्रवासाची नोंद करत नाही तर कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास पुरावा म्हणून काम करते.
डोके आणि मानेसाठी उशी
लांबच्या प्रवासात विश्रांती खूप महत्त्वाची असते. म्हणून, कारच्या सीट्ससाठी खास तयार केलेल्या उशा किंवा कुशन वापरा. यामुळे तुमच्या मानेला आणि पाठीला आराम मिळेल.
पोर्टेबल एअर प्युरिफायर
जर तुम्ही प्रदूषित भागातून प्रवास करत असाल तर तुमच्या कारमध्ये पोर्टेबल एअर प्युरिफायर इंस्टॉल करा. यामुळे कारमधील हवा स्वच्छ आणि ताजी राहील.