फोटो सौजन्य- iStock
नवीन बाईक घेताना आपण जुन्या बाईकला विकतो. आज या बाईक विकण्यासाठी अनेक ऐजंट ते ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहे. ज्याद्वारे आपल्याला बाईकसाठी ग्राहक मिळू शकतो. जुनी बाईक विकल्याने आपल्याला मिळणारी रक्कम आपल्या नवीन बाईकसाठी महत्वाची ठरते. तर हीच जुन्या बाईकची विक्री रक्कम वाढू शकते. यासाठी तुम्हाला बाईकमध्ये काही लहान मोठे बदल करावे लागतील ज्यामुळे तुम्हाला बाईक विक्रीतून मिळणाऱ्या रक्कमेत चांगलीच वाढ होणार आहे. जाणून घेऊया या बदलाबद्दल
बाईकची विक्री करण्यापूर्वी ‘या ‘ करा हे बदल
बाईकची सर्व्हिसिंग- बाईक सर्व्हिसिंगमध्ये बाईकचे इंजिन, चेन, क्लच, ब्रेक इत्यादीची सर्व्हिसिंग केल्याने बाईकचा परफॉर्मन्स चांगला राहतो. यामुळे समोरच्या ग्राहकालाही बाईक चालवताना चांगला अनुभव मिळतो.
बाईकची पेंटिग- अनेक वर्षे वापरल्याने बाईकचा रंग फिका पडतो. अनेकदा बाईकवर लहान मोठे स्क्रॅचही पडतात त्यामुळे बाईक पेंट केल्यास बाईक नवीन आणि आकर्षक दिसते.
टायर्स आणि अलॉय व्हील्स- टायर्स जुने झालेले असतील तर ते बदलू शकता. तसेच अलॉय व्हील्सही गंजतात तर त्याची दुरुस्ती करुन घ्या.
स्पीडोमीटर- बाईकचा स्पीडोमीटर योग्य चालतो आहे की ते तपासा. काहीवेळा केवळ केबलच्या दुरुस्तीनेही स्पीडोमीटर पुर्ववत करता येतो.
हेडलाइट्स आणि इंडिकेटर- बाईकमधील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या घटकांपैकी एक. जर हेडलाइटचा प्रकाश कमी झाला असेल तर ती बदलू शकता. आतील बल्बसाठी जास्त खर्च येत नाही. अनेकदा बाईकचा एखाद्या इंडिकेटर बंद असतो तो बदलणे आवश्यक आहे. ज्यामुळे बाईकची सुरक्षितता राखली जाते शिवाय बाईक आकर्षक दिसते.
सीट कव्हर- बाईकचे सीट कव्हर जुने झाले असल्यास नवीन चांगले सीट कव्हर घाला. ज्यामुळे बाईक अधिक आकर्षक दिसेल.
इतर बदल
बाईकमध्ये जर काही घटक तुम्हाला नव्याने इन्सटॉल जसे की एलईडी लाट्स तर तेही तुम्ही करु शकता.
या काही बदलांमुळे तुमची बाईक ही आकर्षक दिसेलच शिवाय बाईकचा परफॉर्मन्स ही सुधारेल. ज्यामुळे समोरच्या ग्राहकाला बाईक विक्री करताना तुम्ही चांगल्या किमंतीमध्ये बाईक विकू शकता. समोरचा ग्राहकही बाईकची चांगली स्थिती पाहून योग्य रक्कम तुम्हाला देऊ शकतो.