फोटो सौजन्य- iStock
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतीय ग्राहकांकडून वाढू लागली आहे. त्यातल्या त्यात बाईक आणि स्कूटरची मागणी ही जास्त आहे. दर महिन्याला बाजारपेठेमध्ये नवनवीन टू-व्हीलर लॉंच केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळे पर्यायही उपलब्ध होत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणेज या बाईक अथवा स्कूटर इंधन खर्चात प्रचंड कपात करतात आणि पर्यावरणपूरक असल्याने सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जात आहे. फक्त इलेक्ट्रीक वाहननिर्मिती कंपन्या या दुचाक्यांच उत्पादन करतातच मात्र प्रस्थापित कंपन्यांनीही आता इलेक्ट्रिक टू व्हीलर तयार करण्याकडे जास्त लक्ष दिले आहे.
या कंपनीचे वर्चस्व
भारतामध्ये TVS, Hero, Ather यासह अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारात विक्री करत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी अशी एक कंपनी अशी आहे जिने विक्रीच्या बाबतीत या मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे. ती कंपनी आहे, ओला इलेक्ट्रिकद्वारे जुलै 2024 मध्ये 114.49 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 41,624 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करण्यात आली आहे. कंपनीची जुलै २०२३ मध्ये एकूण विक्री फक्त १९,४०६ युनिट्स होती. विक्रीतील या वाढीमुळे, ओला इलेक्ट्रिकचे टू व्हीलर प्रकारामध्ये वर्चस्व प्रस्थापित केले असून या विभागातील बाजारातील हिस्सा 38.64 टक्के झाला आहे.
सध्या ओला इलेक्ट्रिकचे तीन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये S1 Pro, S1 Air आणि S1 यांचा समावेश आहे Ola S1 pro ही कंपनीची सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्याची किंमत 1.34 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर Ola S1 Air ची किंमत 1,06,499 रुपये (एक्स-शोरूम) आणि Ola S1 ची किंमत आहे . ओलाकडून ola Roadster या इ बाईकचेही 15 ऑगस्टला लॉंचिग केले गेले आहे. या बाईकची एक्स-शोरूम किमंत 74999 रुपयांपासून सुरु होते.
पहिल्या पाच कंपनी भारतीय
विक्रीच्या या यादीत भारतीय कंपन्यांनीच पहिल्या पाच क्रमवारीमध्ये स्थान मिळविले आहे. ओलानंतर टीव्हीएस दुसऱ्या स्थानावर असून या कालावधीत, कंपनी ने 87.40 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 19,486 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली. TVS आपल्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे तीन मॉडेल बाजारात विकत आहे. बजाजने या यादीत तिसरे स्थान पटकावले आणि एकूण 17,657 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री 327.43 टक्के वार्षिक वाढीसह नोंदवली.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीच्या या यादीत एथर एनर्जी चौथ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत, एथरने 50.89 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 10,087 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली. तर Hero MotoCorp ने 409.60 टक्के वार्षिक वाढीसह Vida इलेक्ट्रिक स्कूटरच्या एकूण 5,045 युनिट्सची विक्री करून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.