फोटो सौजन्य: Freepik
कित्येक वेळा वाहने चांगली असतात, परंतु त्यांच्या विक्रीचे आकडे कमी असल्याने कंपनीला ते मॉडेल बंद करावे लागतात. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की कंपनी कारचे योग्य मार्केटिंग करत नाही ज्यामुळे कारची योग्य माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. तर कधी लोकांना कारचे डिझाइन किंवा लुक आवडत नाही.
सध्या अधिकाधिक अत्याधुनिक वाहने येत जरी असले तरी आता जुन्या बंद पडलेल्या वाहने अत्यंत कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत. या गाड्या खरेदी करून तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही गाड्यांबद्दल.
Honda BR-V
होंडाची BR-V 7 ही कार Honda Mobilio ची अपग्रेडेड व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अश्या दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध करून दिली आहे. ही कार पेट्रोलमधील स्मूथ आणि सायलेंट इंजिनसाठी ओळखली जात होती, तर डिझेलमध्ये या कारने जबरदस्त मायलेज दिले होते. सध्याच्या कार बाजारात, Honda BR-V ही गाडी 5.5 लाख ते 7 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असेल. ही कार फारशी विकली गेली नसल्याने तिचे पार्ट्स मिळण्यात काही अडचण येऊ शकते.
Maruti Suzuki S-Cross
मारुती सुझुकी एस-क्रॉस या गाडीची उत्तम इंजिन आणि कामगिरी असून सुद्धा ही कार कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. या कारचा सर्वात मोठा दोष म्हणजे तिची हॅचबॅकसारखी रचना. इतर कंपन्या या किमतीत एसयूव्ही वाहने देत होत्या. त्यामुळेच स्पर्धेच्या तुलनेत या कारच्या विक्रीचा आलेख तितकासा चांगला नव्हता. त्यानंतर लवकरच कंपनीला या गाडीची निर्मिती बंद करावी लागली. सेकंड हँड मारुती एस-क्रॉस 5 ते 7 लाख रुपये किमतीत बाजारात उपलब्ध असेल.
Volkswagen Ameo
जर्मन कार उत्पादक फोक्सवॅगनची Ameo ही कॉम्पॅक्ट आकाराची सेडान डिझाइन कार होती. ही कार तीन इंजिनांमध्ये आली: 1.0 L, 1.2 L आणि 1.5 L. ज्यात ती डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही इंजिनमध्ये विकली जात होती. ही कार तुम्हाला सेकंड हँड कंडिशनमध्ये 4 ते 5 लाख रुपयांमध्ये मिळेल.
Maruti Baleno RS
मारुती सुझुकीने काही वर्षांपूर्वी भारतीय बाजारातून बलेनो आरएस बंद केली होती. ही कार 1.0 लीटर बूस्टर जेट इंजिनसह आली होती, ज्याची कार्यक्षमता खूप शक्तिशाली होती. परंतु त्याच्या नॉन-एस्पिरेटेड (एनए) पेट्रोल इंजिनची विक्री जास्त होती ज्यामुळे ही गाडी बाजारात लोकप्रिय होऊ शकले नाही. बंद होण्यापूर्वी त्याची ऑन-रोड किंमत सुमारे ९.५ लाख रुपये होती. वापरलेल्या स्थितीत विकत घ्यायची असेल तर 4-5 लाख रुपयांना ही गाडी तुम्हाला मिळू शकते.