अशाप्रकारे वाढवा बाईकचा मायलेज (फोटो सौजन्य: iStock)
कार्बरेटरला रियून करा: कार्ब्युरेटर रिट्यून केल्याने तुमच्या बाइकचे मायलेज वाढण्यास मदत होऊ शकते. जर तुमच्या बाईकचे मायलेज कमी असेल तर त्याच्या कार्बोरेटर सेटिंग्ज नक्की तपासा. जर त्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान दिसले तर त्वरित मेकॅनिककडे आपली बाईक घेऊन जावी.
उगाचच पेट्रोल वाया घालवू नका: तुम्हाला 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहावे लागत असल्यास, बाईकचे इंजिन बंद करा. इंजिन चालू ठेवल्यास इंधन वाया जाते.
टायरचा प्रेशर चेक करा: बाईकचा टायर प्रेशर नेहमी योग्य ठेवावा. बाईक निर्मात्याने निर्दिष्ट केलेला हवेचा प्रेशर नेहमी राखला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तर पेट्रोल पंपावर टायरमधील हवेचा दाब नक्की तपासा.
बाईक नेहमी साफ करा: तुम्ही तुमची बाईक नियमित स्वच्छ ठेवावी. यावेळी, बाइकचे चालणारे सर्व पार्टस लुब्रिकेट करून घ्या. यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि कार्यक्षमता टिकून राहते. त्यामुळे तुमची बाइक चांगली मायलेज देते.
मॉडिफिकेशन गरजेचे आहे का?: बाईकचे डिझाइन करताना ती बनवणारे अभियंते तिची एयरोडायनामिक कार्यक्षमता लक्षात ठेवतात. त्यामुळे बाईकमध्ये बदल करणे टाळावे. याचा परिणाम केवळ एरोडायनॅमिक्सवर होत नाही तर मायलेजवरही परिणाम होतो.