फोटो सौजन्य: iStock
देशात 2024 मध्ये अनेक उत्तम कार्स लाँच झाल्या, ज्यांना ग्राहकांनी सुद्धा भरघोस प्रतिसाद दिले. आता अनेक ऑटो कंपन्या नवीन वर्षात दर्जेदार आणि हाय परफॉर्मन्स वाहने लाँच करण्यास सज्ज झाले आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये भारत मोबिलिटी 2025 हा ऑटो एक्स्पो इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या ऑटो एक्स्पो मध्ये विविध सेगमेंटमधील वाहनं लाँच होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अनेक कार्स आणि बाईकप्रेमींचे लक्ष या ऑटो एक्सपोकडे लागले आहे.
देशातील वाहनांची वाढती मागणी पाहून, जगभरातील वाहन उत्पादक भारतीय मार्केटमध्ये त्यांची अनेक उत्तम वाहने ऑफर करत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत ही काही कंपन्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे. म्हणूनच भारत मोबिलिटी 2025 मध्ये देश आणि जगातील अनेक वाहन निर्माते यावेळीही त्यांची नवीन वाहनं आणि तंत्रज्ञान सादर करण्याच्या तयारीत आहेत.
जुनी किंमत विसरा ! आता Citroen Basalt खरेदी करणे झाले अजूनच महाग, कंपनीने ‘इतकी’ वाढवली किंमत
भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 चे दुसरे व्हर्जन केव्हा आणि कुठे आयोजित केले जाईल? कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि वाहने पाहता येतील. हे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोचे दुसरे व्हर्जन या वर्षी जानेवारी महिन्यातच आयोजित केले जाणार आहे. 2024 च्या तुलनेत यावर्षी हा ऑटो एक्स्पो मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्ली आणि यूपीमधील ग्रेटर नोएडा येथे एकूण तीन ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
भारत मोबिलिटीच्या दुसऱ्या व्हर्जनचे आयोजन करण्याबरोबरच स्थळाची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे. माहितीनुसार, हा कार्यक्रम तीन ठिकाणी आयोजित केला जाईल. ज्यामध्ये दिल्लीतील भारत मंडपम, द्वारकामधील यशोभूमी आणि ग्रेटर नोएडामधील इंडिया एक्सपो सेंटर आणि मार्ट यांचा समावेश आहे.
‘या’ देशात चक्क आहे Blue Traffic Light, 99 % लोकांना याचा अर्थच माहित नाही
भारत मोबिलिटी 2025 चा मुख्य कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. 17 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान येथे Auto Expo 2025 चे आयोजन केले जाईल. याशिवाय येथे इंडिया इंटरनॅशनल टायर शो, इंडिया सायकल शो, भारत बॅटरी शो, स्टील पॅव्हेलियन आणि मोबिलिटी टेक पॅव्हेलियनचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारत मोबिलिटी 2025 चे आयोजन द्वारका येथे देखील केले जाईल. 18 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये कंपोनंट शो आयोजित केले जाईल.
हाच कार्यक्रम इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे 19 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केला जाईल. ग्रेटर नोएडा येथे इंडिया कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट एक्स्पो आणि अर्बन मोबिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर शोचे आयोजन केले जाईल.