फोटो सौजन्य: Social Media
आज प्रत्येक जण आपले स्वतःचे वाहन खरेदी करताना दिसत आहे. पण वाहन खरेदी केल्यानंतर सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे वाहतुकीचे नियम पाळणे. जर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळत नसाल तर मग तुम्हाला दंड सुद्धा भरावा लागू शकतो. वाहतुकीचा बेसिक रुल म्हणजे ट्रॅफिक लाइट्सवरील सिग्नल्स फॉलो करणे. खरेतर लहानपणापासून आपल्या समजते की ट्रॅफिक सिग्नल्स मध्ये तीन रंगाचा समावेश असतो. यातील लाल रंग म्हणजे थांबणे, पिवळा रंग म्हणजे हळुवार चालणे आणि हिरवा म्हणजे पुढे वाहन घेऊन जाणे. पण याव्यतिरिक्त तुम्ही कधी निळ्या रंगाचे सिग्नल कधी पाहिले आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
आजपर्यंत तुम्ही फक्त तीनच रंगाचे सिग्नल्स पाहिले असेल, पण याव्यतिरिक्त आज आपण निळ्या रंगाच्या सिग्नलबद्दल जाणून घेणार आहोत. ट्रॅफिक लाइटचा रंगही निळा असतो हे तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. हे कोणालाही आश्चर्यचकित करेल, परंतु एक असा देश आहे जिथे आजही निळे ट्रॅफिक लाइट आहेत. तो देश म्हणजे जपान. या निळ्या ट्रॅफिक लाइटबद्दल 99% लोकांना माहिती नाही आहे. म्हणूनच आज आपण या निळ्या ट्रॅफिक सिग्नलबद्दल जाणून घेणार आहोत.
‘या’ भारतीय YouTuber ला मानला ! फक्त 13 लाखात बनवली 30 कोटी किंमतीची कार
जपान म्हंटलं की आपल्या डोळ्यांसंमोर एक आधुनिक आणि टेक्नॉलॉजीच्या सोबतीने भविष्याची वाटेवर चालणार देश आठवतो. आजही जपानमधील असे काही भन्नाट टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. जपानमध्ये अनेक अतरंगी गोष्टी पाहायला मिळतात. त्यापैकीच एक तेथील निळ्या रंगाचे ट्रॅफिक सिग्नल. जपानमधील काही ट्रॅफिक लाइट हिरव्या ऐवजी निळे दिसतात. पण तो पूर्णपणे निळा नसून हिरव्या रंगाची अतिशय गडद सावली त्यात आहे.
जपानी भाषेत रंगांबद्दल एक खास गोष्ट आहे. जपानी भाषेत “आओ(Ao)” हाच शब्द निळा आणि हिरवा या दोन्हीसाठी वापरला जातो. जेव्हा जपानमध्ये ट्रॅफिक लाइट्स पहिल्यांदा बसवण्यात आले तेव्हा प्रकाश हिरवा असला तरीही “जा” दर्शविण्यासाठी “आओ” हा शब्द वापरला गेला.
नवीन वर्षात Kawasaki Bikes वर छप्परफाड डिस्काउंट, शोरुमध्ये ग्राहकांची गर्दीच गर्दी
हळूहळू, जपानी भाषेत हिरव्यासाठी एक वेगळा शब्द, “मिडोरी” वापरला जाऊ लागला. परंतु जुन्या कागदपत्रांमध्ये आणि बऱ्याच लोकांच्या मनात “आओ” हा शब्द हिरव्या रंगाशी संबंधित राहिला. म्हणूनच, जेव्हा जपानमध्ये ट्रॅफिक लाइट्सचे मानकीकरण करण्याचे ठरवले आले तेव्हा एक तडजोड केली गेली. हिरव्या ऐवजी, एक असा रंग निवडला गेला जो हिरवा आणि निळा यांच्यामधील असेल. हा रंग अजूनही हिरवा आहे, परंतु थोडा गडद देखील आहे, ज्यामुळे तो निळा दिसतो.