फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ
देशात सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. याकाळात मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून वाहनांची खरेदी केली जाते. त्यामुळे याकाळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांकडून सवलतीच्या विविध ऑफर्स बाजारात उपलब्ध केल्या जात आहेत. TVS मोटरनेही नवीन ग्राहकांसाठी एका बाईकवर जबरदस्त ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या नव्या रेट्रो बाईक Ronin च्या बेस व्हेरियंटची किंमत 15,000 रुपयांनी कमी केली आहे. TVS रोनिनच्या या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत या ऑफर्समुळे 1.35 लाख रुपयांपासून झाली आहे.
TVS Ronin बाईक ही भारतीय बाजारापेठेमध्ये SS, DS, TD आणि TD स्पेशल एडिशन या 4 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या चारपैकी कंपनीकडून बेस SS व्हेरियंटची किंमत कमी करण्यात आली आहे. या किंमत कपातीमुळे रोनिन एसएस ही ग्राहकांचे लक्ष वेधणार आहे. रोनिन बाईकच्या लाइनअपमधील पुढील प्रकार DS ची एक्स शो रुम किंमत ही 1.57 लाख रुपयांपासून सुरू होते.
TVS Ronin इंजिन क्षमता
रोनिन मध्ये एअर/ऑइल-कूल्ड, 225.9cc, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे 7,750rpm वर 20.4hp आणि 3,750rpm वर 19.93 Nm टॉर्क जनरेट करते. या मोटरमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचसह 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. 14 लिटर इंधन टाकीसह, रोनिनचे वजन 160 किलो आहे.
TVS Ronin ची वैशिष्ट्ये
TVS Ronin च्या वैशिष्टांबद्दल बोलायचे झाल्यास बाईकमध्ये पूर्ण एलईडी लाइटिंग, ऑफसेट सिंगल-पॉड डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ॲडजस्टेबल लीव्हर्ससह अनेक वैशिष्ट्याचा समावेश आहे. रोनिनच्या स्पर्धक बाईक प्रतिस्पर्ध्यांबद्दल बोललो तर, TVS रोनिनला रॉयल एनफील्ड हंटर 350 कडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
किंमतीमधील कपातीवरून हे स्पष्ट होत आहे की कंपनीला TVS Ronin बाईक ग्राहकांसाठी अधिक किफायतशीर बनवायची आहे. ज्यामुळे Ronin ची होणारी विक्री ही रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या तुलनेत वाढू शकेल. या किंमतीच्या बदलामुळे, TVS कडे रॉयल एनफील्डवर मात करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे मात्र सर्वात महत्वाचे म्हणेज या स्पर्धेचा फायदा ग्राहकांना होत आहे.