फोटो सौजन्य: Social Media
भारतात ज्याप्रमाणे नॉर्मल आणि बजेट फ्रेंडली कार्स मोठ्या प्रमाणात चालत असतात. त्याचप्रमाणे लक्झरी कार्सची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. लक्झरी आणि हाय परफॉर्मन्स कार्सबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होताना दिसते तेव्हा आपसूकच बीएमडब्ल्यू या ऑटो कंपनीचे नाव आपल्या मनात येते.
भारतात बीएमडब्ल्यूच्या कार्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. ग्राहकांची हीच मागणी पाहता कंपनी सुद्धा उत्तोमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणत असते. नुकतेच BMW ने भारतात आपली नवीन कार लाँच केली आहे, ज्याचे नाव BMW M4 CS आहे. भारतात त्याची एक्स-शोरूम किंमत तब्बल1.89 कोटी रुपये आहे. ही कार अधिक जलद होण्यासाठी अनेक यांत्रिक बदल करण्यात आले आहेत. भारतात लाँच होणारे हे बीएमडब्ल्यूचे पहिले सीएस मॉडेल आहे.
BMW M4 CS मध्ये जुन्या M4 प्रमाणेच 3.0-लिटर ट्विन-टर्बो स्ट्रेट-सिक्स इंजिन आहे. हे इंजिन 550 एचपी पॉवर आणि 650 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनमधील बदलांमुळे ही कार केवळ 3.4 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. त्याचा टॉप स्पीड ताशी 302 किलोमीटर इतका आहे. BMW चे Adaptive M सस्पेन्शन देखील आहे.
लांब ट्रॅक सेशन सहन करण्यासाठी त्यात काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये उत्तम कूलिंग सिस्टीम आणि क्लचला वाढीव ऑइल सप्लाय देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने, फोर-व्हील-ड्राइव्ह सिस्टमची कार्यक्षमता सुधारली आहे. टायटॅनियम एक्झॉस्ट सायलेन्सर आणि सेंटर कन्सोल, गिअरबॉक्स पेडल्स आणि अनेक इंटीरियर ट्रिम पीससह विविध कार्बन फायबर-रिइन्फोर्स्ड प्लास्टिक (CFRP) मुळे ही कार पूर्वीपेक्षा हलकी आहे.
हे देखील वाचा: स्वस्तात मस्त किंमतीत लाँच झाली Nissan Magnite Facelift, मिळणार 55 सेफ्टी फीचर्स
या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6 एअरबॅग्ज, ब्रेक असिस्टसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), BMW कंडिशन बेस्ड सर्व्हिस (इंटेलिजन्स मेंटेनन्स सिस्टम), कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल (CBC), डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल (DSC), ऑटोमॅटिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ASC), डायनॅमिक ब्रेक आहेत. कंट्रोल (DBC), इलेक्ट्रॉनिक वाहन इमोबिलायझर, ऑटो होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रोमेकॅनिकल पार्किंग ब्रेक, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग, चाइल्ड प्रूफ लॉक, साइड-इम्पॅक्ट प्रोटेक्शन, क्रॅश सेन्सर आणि डायनॅमिक ब्रेकिंग लाइट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, मोबिलिटी किट आहेत.