फोटो सौजन्य: Social Media
आपल्या स्वतःच्या कारमध्ये प्रवास करणे हे प्रत्येक मध्यम वर्गीय कुटुंबियांचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येक जण रात्रंदिवस झटत असतात. पूर्वी कार घेण्यासाठी लोकांना पैश्यांची बचत करावी लागायची. पण आता ईएमआयमुळे फक्त कारच नाही तर इतर गोष्टी सुद्धा विकत घेणे सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत.
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपनीज उत्तम कार्स ऑफर करत असतात. त्यातीलच एक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. मारुती सुझुकीच्या कार्स किफायती किंमती आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. जर तुम्ही सुद्धा मारुती सुझुकीची सीएनजी व्हेरियंट असणारी कार विकत घेण्याचा प्लॅन केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुमच्यासाठी मारुती सुझुकी ब्रेझा एक उत्तम पर्याय असू शकतो. ही कार ऑक्टोबर 2024 मधील कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे.
ही कार सीएनजी व्यतिरिक्त, पेट्रोल व्हेरियंटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.ही कार तुम्ही ईएमआयच्या साहाय्याने देखील खरेदी करू शकता. यासाठीच आज आपण Brezza च्या ऑन-रोड किमतीपासून ते डाउन पेमेंटपर्यंतच्या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी Lxi सीएनजी व्हेरियंटसह 9 लाख 29 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला कारवर 65 हजार 30 रुपये आरटीओ फी आणि 46 हजार 944 रुपये विमा रक्कम भरावी लागेल. याशिवाय 10,645 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल. अशा प्रकारे या कारची ऑन रोड किंमत 10 लाख 40 हजार 974 रुपये होते. हि किंमत तुमच्या जवळील कार शोरुमनुसार बदलू शकते.
राजधानी दिल्लीत ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला ब्रेझाचे डाउन पेमेंट म्हणून 1 लाख रुपये द्यावे लागतील. यासाठी तुम्हाला 9 लाख 40 हजार 974 रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. 10 टक्के व्याजदराने कर्ज घेतल्यास, 19 हजार 993 रुपयांचे एकूण 60 ईएमआय होतील, ज्याची तुम्ही 5 वर्षांत परतफेड करू शकता.
हे देखील वाचा: रतन टाटा यांची Jaguar कंपनी लवकरच आणणार आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक कार
मारुती सुझुकी ब्रेझ्झाच्या इंजिनमध्ये पेट्रोल हायब्रिड आणि पेट्रोल सीएनजीचा पर्याय आहे. या कारमध्ये 1.5-लिटर इंजिन आहे, जे पेट्रोल आणि CNG दोन्हीसाठी आहे. या कारचा ट्रान्समिशन पर्याय 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक युनिट आहे.
मारुती सुझुकी ब्रेझाचा पेट्रोल सीएनजी व्हेरियंट 99 बीएचपीची पीक पॉवर देते आणि 136 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, फक्त CNG व्हेरियंटमध्ये ही कार 86 bhp चा पीक पॉवर देते आणि 121.5 Nm टॉर्क जनरेट करते.