फोटो सौजन्य- सोशल मीडिया
बजाज ऑटोने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक क्रांतीकारक पाऊल टाकत जगातील पहिली सीएनजीवर चालणारी बाईक लॉंच केली. CNG-फ्रीडम या बाईकला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता बजाज अजून एक अनोखी बाईक लॉंच करण्याचा विचार करत आहे. कंपनी CBG (कंप्रेस्ड बायोगॅस) पॉवरवर चालणारी बाईक निर्मितीचा विचार करत असून ही पहिली कंप्रेस्ड बायोगॅस पॉवरवर चालणारी बाईक असणार आहे. या बाईकबद्दल बजाज ऑटोचे सीईओ राजीव बजाज यांनी तसे संकेत दिले आहेत. ते पुण्यात आयोजित अमूल क्लीन फ्युएल बायोसीएनजी कार रॅलीमध्ये सीईओ यांनी याबद्दल बोलले.
“सीएनजी बाईक ही सीबीजीसाठीही योग्य आहे. आणि अमूल सीबीजीच्या निर्मितीकरिता करत असेलेले कार्य अद्भूत आहे. जर त्याचे मोठ्या प्रमाणावर रूपांतरित केले गेले, जे मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ते होईल, तर वाहने देखील CBG वर धावतील,” असे राजीव बजाज यांनी सांगितले.
bajaj freedom 125 ला मिळत आहे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
वाहन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या डेटाबेसनुसार, भारतीय बाजारपेठेत फ्रीडम 125 सीएनजीचे तब्बल 20 हजारहून जास्त मॉडेल्स विकल्या गेल्या आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये 4 ते 5 हजार विक्री झाली होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात सणासुदीमुळे फ्रीडमच्या विक्रीत कमालीची वाढ झालेली पाहायला मिळाली. ऑक्टोबरमध्ये तब्बल 11 हजारहूज जास्त मॉडेल्सची विक्री झाली. फ्रीडम बाईक कंपनीने 5 जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लॉंच केली. त्यानंतर ही बाईक ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली आहे. या बाईकमध्ये 2 किलो सीएनजी टँकसह 2 लिटर पेट्रोल टाकी देण्यात आली आहे.
bajaj freedom 125 बाईक इंजिन, मायलेज
जगातील पहिली CNG बाईक 125cc सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे. इंजिन 8,000rpm वर 9.5hp आणि 6,000rpm वर 9.7Nm जनरेट करते. कंपनीने या बाईकबद्दल दावा केला आहे की तिची रेंज 330km आहे. वापरकर्ते मोटरसायकल सीएनजी किंवा पेट्रोल मोडमध्ये चालवू शकतात. हा मोड बदलण्यासाठी चालकांना फक्त एक स्विच वापरण्याची आवश्यकता आहे. कंपनीने दावा केल्यानुसार CNG मायलेज 102km/kg आहे. तर पेट्रोलची कार्यक्षमता ही 65kmpl आहे.
bajaj freedom 125 डिझाइन
बाईक डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास , कंपनी संपूर्ण एलईडी हेडलाइट तसेच टेललाइट देते. इंडिकेटर हॅलोजन आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एक मोनोक्रोम एलसीडी आहे आणि त्याला ब्लूटूथला सपोर्ट करतो. टाकीवरील मोठा फ्लॅप पेट्रोल तसेच CNG इंधन टाक्यांमध्ये आहे. टाकीचा वरचा भाग देखील एअर फिल्टरमध्ये जातो. बाईकवर दोन रंगाची कॉम्बीनेशन डिझाइन आहे. या बाईकची एक्स शो रुम किंमत ही 89997 रुपये इतकी आहे.