फोटो सौजन्य: iStock
पूर्वी कार घेताना कार खरेदीदार फक्त दोनच गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचे, एक म्हणजे मायलेज आणि दुसरे म्हणजे किंमत. पण आजचा कार खरेदीदार सुजाण झालं आहे. आज नवीन कार खरेदी करताना ग्राहक मायलेज, किंमत आणि सुरक्षेला जास्त प्राधान्य देताना दिसत आहे.
अनेक ऑटो कंपनीज सुद्धा ग्राहकांची सुरक्षितता लक्षात ठेवून मार्केटमध्ये सेफेस्ट कार लाँच करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आजच्या काळात लोकांच्या सुरक्षेचाही विचार करणे ही आता कार उत्पादक कंपनीजची मोठी जबाबदारी आहे. लोकं सुद्धा खरेदी करणार असलेली कार किती सुरक्षित आहे हेही तपासतात.
आता वर्ष संपायला फक्त दोन महिन्यांचा कालावधीच शिल्लक आहे. अशावेळी ऑटो कंपनीज अनेक आकर्षक ऑफर्स देत असतात. म्हणूनच जर तुम्ही देखील परवडणारी किंमत आणि 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला काही 5-स्टार सेफ्टी रेटिंग कारबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही खरेदी करण्याचा विचार करू शकता.
एवढी किंमत कुठे असते का? Kawasaki कडून दोन नवीन बाईक्स भारतात लाँच
भारतामध्ये टाटा मोटर्सची अनेक कार्स आहेत ज्यांना ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टाटा मोटर्सच्या या कारच्या यादीत टाटा हॅरियर, टाटा सफारी, टाटा नेक्सॉन, टाटा पंच आणि टाटा अल्ट्रोजची नावे समाविष्ट आहेत. जर 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या कार्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात टाटा पंच, अल्ट्रोज आणि नेक्सॉनची नावे आहेत.
या यादीतील पहिले नाव टाटा पंच आहे, जी भारतीय बाजारपेठेतील 5-स्टार सेफ्टी रेटिंग असलेली सर्वात स्वस्त SUV आहे. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तिची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख रुपये आहे. या कारला ग्लोबल NCAP कडून क्रॅश चाचणीत 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
याशिवाय, या यादीत दुसरे नाव टाटा अल्ट्रोजचे आहे, त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.6 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारने 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे.
तिसऱ्या कारबद्दल बोलायचे झाले तर ती आहे Tata Nexon. ग्राहक ही कार भारतीय बाजारपेठेत 8 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करू शकतात. या कारला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे.
पुढील कार मारुती सुझुकी डिझायर आहे, ज्याने येताच मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी ही मारुतीची पहिली कार ठरली आहे. मारुतीची ही कार 6.79 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे.
ग्लोबल NCAP कडून कार्सना क्रॅश टेस्टिंगमध्ये सेफ्टी रेटिंग मिळते जी कार्सची सर्व फीचर्स तपासते आणि त्यानुसार त्यांना रेटिंग देते.