फोटो सौजन्य: iStock
भारतात विविध सेगमेंटमधील कार्स विकल्या जातात. यातही एसयूव्ही सेगमेंटच्या कार्सना ग्राहकांकडून चांगलीच मागणी पाहायला मिळते. पण एसयूव्ही व्यतिरिक्त अन्य कार्स सुद्धा आहेत ज्यांनी मागील महिना म्हणजेच ऑक्टोबर 2024 चा महिना चांगलाच गाजवला आहे. या कार्स मिड साइझ सेडान कार्स होत्या.
देशभरात नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री केली जाते. तसेच दर महिन्याला कोणत्या सेगमेंटची कारने विशेष बाजी मारली आहे, हे जाणून घेण्यासाठी दर महिन्याला सेल्स रिपोर्ट सुद्धा सादर केला जातो. मिड साइज सेडान कार सेगमेंटमध्ये अनेक कंपनीजकडून कार्स ऑफर केल्या जातात. या बातमीमध्ये आज आपण जाणून घेऊया की ऑक्टोबर 2024 मध्ये किती मिड साइज सेडान कार विकल्या गेल्या आहेत.
मारुती, ह्युंदाई, फोक्सवॅगन आणि स्कोडा सारख्या वाहन उत्पादक कंपनी देशातील मध्यम आकाराच्या सेडान कार सेगमेंटमध्ये सर्वोत्तम कार ऑफर करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये देशभरात SUV आणि हॅचबॅक तसेच मध्यम आकाराच्या सेडान कारची मागणी दिसून आली आहे. या सेगमेंटमध्ये गेल्या महिन्यात देशभरात एकूण 6800 हून अधिक युनिट्सची विक्री झाली. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या कार्सचं एकूण विक्री सुमारे 8200 युनिट्स होती.
फॉक्सवॅगनने Virtus ला मध्यम आकाराची सेडान म्हणून ऑफर केले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये कंपनीच्या या सेडान कारच्या एकूण 2351 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये या सेडान कारची एकूण विक्री 1772 युनिट्स होती.
Skoda-Volkswagen ने ‘या’ मॉडेल्सच्या 52 कार्स बोलावल्या परत जाणून घ्या अधिक माहिती
फोक्सवॅगनच्या व्हरटसप्रमाणे, Skoda Slavia देखील मध्यम आकाराची सेडान म्हणून आणली आहे. कंपनीच्या या सेडान कारची ऑक्टोबर 2024 मध्ये 1637 युनिट्सची विक्री झाली. तर गेल्या वर्षी ही कार 1943 लोकांनी खरेदी केली होती.
ऑक्टोबर 2024 मध्ये Hyundai च्या वेर्नाला देखील देशात मागणी होती. अहवालानुसार, कंपनीने गेल्या महिन्यात या मध्यम आकाराच्या सेडान कारच्या एकूण 1272 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने या कारच्या एकूण 2313 युनिट्सची विक्री केली होती.
जपानी कार उत्पादक कंपनीद्वारे या मिड साइझ सेगमेंटमध्ये होंडा सिटी देखील ऑफर केली जाते. ही सेडान कार भारतात जवळपास 27 वर्षांपासून पसंत केली जात आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 1004 युनिट्सची विक्री झाली. तर ऑक्टोबर 2023 मध्ये 1553 युनिट्सची विक्री झाली.
देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने या सेगमेंटमध्ये सियाझ ऑफर केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये कंपनीच्या या कारचे फक्त 659 युनिट्स विकले गेले आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात ही कार 695 ग्राहकांनी खरेदी केली होती.