फोटो सौजन्य: Social Media
सध्या सणासुदीचा काळ चालू झाला आहे. या काळात कित्येक जण आपली आवडती कार किंवा बाईक विकत घेत असतात. अशावेळी कंपनीज सुद्धा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स आणत असतात. पण तुम्ही कधी ट्रॅफिक चलनावर सूट पाहिली आहे का? दिल्ली पोलीस आता ट्रॅफिक चलनावर सूट देण्याच्या तयारीत आहे.
सतत घडणाऱ्या राजकीय गोष्टींमुळे राजधानी दिल्ली नेहमीच चर्चेत असते. पण आता दिल्ली चर्चेत आली आहे ती एक अजब गोष्टीमुळे. तुम्ही कार आणि बाईकवर सूट देताना पहिले असेल. परंतु आता दिल्ली पोलीस दिल्लीकरांना चक्क ट्रॅफिक चलनात सूट देणार आहे. वाहतूक पोलिसांनी दिल्लीतील लोकांसाठी चलन जमा करण्यासाठी डिस्काउंट स्कीम आणली आहे. या नवीन ट्रॅफिक चलन ऑफर अंतर्गत लोकांना जुन्या चालानवर 50 टक्के सूट दिली जाणार आहे.
हे देखील वाचा: आजच समजून घ्या कारमधील एसी चालवण्याची योग्य पद्धत, मायलेजमध्ये होईल वाढ
लोकांना चालान भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ही सूट ऑफर आणली आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिस काही चालानवर 50 टक्के सूट देत आहेत. ही ऑफर काही नियमांचे उल्लंघन केल्यावरच लागू होईल. यामध्ये लायसन्सशिवाय वाहन चालवणे, धोकादायक वाहन चालवणे, अयोग्य असताना वाहन चालवणे आदी नियमांचे उल्लंघन केल्यास चालानवर 50 टक्के सूट दिली जाणार आहे.
हे देखील वाचा: हिवाळा सुरु होण्याअगोदर बाईकमध्ये करून घ्या ‘ही’ 5 कामं, मग बघा कशी सुसाट धावेल बाईक
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी ट्रॅफिक चलनच्या या नवीन धोरणाशी संबंधित माहिती शेअर केली आहे. कैलाश गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, हे पाऊल लोकांच्या सोयीसाठी आणि ट्रॅफिक चलनाच्या निराकरणासाठी उचलले जात आहे. परिवहन मंत्री पुढे म्हणाले की, हा नियम लागू करण्यासाठी तो लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
For convenience of the public and to encourage settlement of traffic fines, Delhi Government has decided to compound traffic offences at 50% of the challan amount under specific sections of the Motor Vehicles Act, 1988.
A proposal regarding this has been sent to Hon’ble LG for…
— Kailash Gahlot (@kgahlot) September 11, 2024
उपराज्यपालांच्या मंजुरीनंतरच ही वाहतूक चलन सवलत दिल्लीत लागू केली जाईल. ही ऑफर सध्याच्या चलनासाठी फक्त 90 दिवसांसाठी उपलब्ध असेल, म्हणजेच 50 टक्के सूट फक्त 90 दिवसांसाठी दिली जाईल. तर नवीन चलनासाठी लोकांना या सूटचा लाभ घेण्यासाठी 30 दिवसांच्या आत चलन भरावे लागेल.