फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक दमदार कार्स आधुनिक फीचर्ससह लाँच होत आहे. कार खरेदीदार सुद्धा या कार्सना भरघोस प्रतिसाद देत आहे. परंतु कार घेतल्यानंतर तिला योग्यरित्या मेन्टेन सुद्धा करता आले पाहिजे. जर कार नीट मेन्टेन राहिली नाही तर तिच्यात अनेक खराबी येऊ शकतात.
आज भारतात फक्त कार्स आधुनिक होत नाही आहे तर त्या कार्स ज्या रस्त्यावर धावणार आहेत, ते रस्ते सुद्धा अधिक चांगले होत आहे. अनेक ऑटो कंपनीज हाय क्लास तंत्रज्ञान वापरून कार्स बनवत आहे . परंतु आजही काही सामान्य चुकांमुळे कारमध्ये अनेक समस्या दिसू लागतात. यातीलच एक समस्या म्हणजे कारमधील स्टेअरिंग व्हायब्रेट होणे. चला याची कारणे जाणून घेऊया.
बऱ्याचदा, जेव्हा कारची चाकं अलाइनमेंटच्या बाहेर असतात, तेव्हा ड्रायव्हिंग करताना स्टेअरिंगमध्ये व्हायब्रेशन सुरू होते. कार अलाइनमेंटच्या बाहेर असल्याने ती फक्त एकाच दिशेने जाऊ लागते. असे होत असताना, व्हायब्रेशनही जाणवू लागतात. हे टाळण्यासाठी कारचे अलाइनमेंट वेळोवेळी तपासले पाहिजे. प्रत्येक दोन हजार किलोमीटर नंतर तुमची कार अलाइनेंट करण्याचा प्रयत्न करा.
कारच्या सस्पेन्शनमध्ये काही बिघाड झाला तरीही कार चालवताना स्टेअरिंगमध्ये व्हायब्रेशन सुरू होते. ही समस्या वेळीच सोडवली नाही, तर कारमधील इतर अनेक समस्यांचा धोका वाढतो. त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो.
कार चालवताना निष्काळजीपणा केला गेला आणि खराब रस्त्यावर, खराब ड्रायव्हिंग पॅटर्नसह कार बराच काळ चालवले गेले, तर स्टेअरिंगमध्ये व्हायब्रेशन होण्याचा धोका वाढतो. याशिवाय, कधीकधी हवामानातील तीव्र बदलांमुळे देखील असे घडते.
हे देखील वाचा: तरुणाईला भुरळ घालणाऱ्या रेसिंग कार्स का असतात एवढ्या खास? जाणून घ्या
जेव्हा तुमच्या कारच्या ब्रेक रोटरमध्ये काही बिघाड होतो तेव्हा कार चालवताना स्टेअरिंगमध्ये व्हायब्रेशन सुरू होते. सहसा हे तेव्हा घडते जेव्हा कारवर ब्रेक लावले जातात. ब्रेक रोटर आणि ब्रेक पॅड मिळून कार थांबवतात किंवा तिचा वेग कमी करतात. परंतु जेव्हा ते खराब होतात तेव्हा स्टेअरिंग व्हायब्रेट होऊ लागते.
जर कार चालवताना स्टेअरींग व्हायब्रेट होत असेल तर जराही वेळ न दवडता त्याची नीट तपासणी करावी. यासाठी नेहमी चांगल्या मेकॅनिककडे जावे. मेकॅनिक ब्रेक आणि सस्पेंशनमधील खराबी दूर करू शकतो. कारच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी तुम्ही सुद्धा तुमचा खराब ड्रायव्हिंग पॅटर्न आणि खराब रस्त्यावर गाडी चालवण्याची चूक सुधारली पाहिजे.