फोटो सौजन्य: iStock
आजही जर एखादी रेसिंग कार रस्त्यावरून जाताना दिसली की अनेकांच्या नजरा तिच्यावर रोखल्या जातात. अनेकदा आपण टीव्हीवर कार्समधील रेसिंग पाहत असतो. या रेसिंगमध्ये अनेक जबरदस्त आणि हाय परफॉर्मन्स असणाऱ्या कार्स वापरल्या जातात. या कारचे डिझाइन लक्झरी कारलाही लाजवेल असे असते. तसेच याची पॉवर सुद्धा एवढी दमदार असते की अनेक जणांना या कार्स चालवण्याचा मोह आवरता येत नाही.
रेसिंग कार्समध्ये असे अनेक वैशिष्ट्य असतात ज्यामुळे अनेकांना या कार्स भुरळ घालतात. रेसिंग कारमध्ये हाय स्पीड, स्टेबिलिटी आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी स्पेशल मटेरिअल्स आणि इंजिनिअरिंग तंत्र वापरलेले जातात. चला जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहे जे या कारला विशेष एक खास कार बनवतात.
रेसिंग कारचे मुख्य भाग कार्बन फायबरपासून बनवलेले असतात. हे मटेरियल खूप हलके असण्यासोबतच मजबूत सुद्धा असते, ज्यामुळे कारचे एकूण वजन कमी होते आणि ते अधिक वेगवान होण्यास मदत होते. हे मटेरियल हलके असल्याकारणाने कमी इंधन वापरते. तसेच कार्बन फायबर क्रॅश दरम्यान ऊर्जा शोषून सुरक्षितता देखील देते.
हे देखील वाचा: ‘ही’ आहे भारतात विकली जाणारी सर्वात महागडी बाईक, किंमत Fortuner Innova पेक्षा जास्त
रेसिंग कार अत्यंत एरोडायनॅमिक असण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. त्यात हवेचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी स्पॉयलर, विंग्स आणि पॅनेल्स समाविष्ट आहेत, जे कारला ट्रॅकवर स्टेबल ठेवतात. हे डिझाईन्स वाऱ्याचा प्रतिकार कमी करतात आणि कारला हाय स्पीडमध्ये स्टेबल ठेवतात.
रेसिंग कार्समध्ये अतिशय शक्तिशाली इंजिन बसवले जाते, ज्यांची क्षमता 1,600 CC ते 4,000 CC किंवा त्याहूनही अधिक असू शकते. ही इंजिने हजारो हॉर्स पॉवर निर्माण करतात आणि काही सेकंदात कारला 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने नेऊ शकतात. ही इंजिन विशेषतः उच्च RPM वर कार्य करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
रेसिंग टायर्समध्ये विशेष मटेरियल आणि डिझाइन असते. हे टायर्स सामान्य टायर्सपेक्षा जास्त रुंद आणि चिकट असतात जेणेकरुन ते साधारण कार्सपेक्षा जास्त वेगाने अधिक पकड देतात. रेसिंग टायर्समध्ये उत्कृष्ट पकड आणि स्टेबिलिटी असते, ज्यामुळे कार वळणावर घसरण्याचा धोका कमी होतो.
रेसिंग कारमध्ये कार्बन-सिरेमिक ब्रेक वापरले जाते, जे हाय स्पीडमध्ये देखील कार लवकर थांबवू शकते. हे ब्रेकिंग सिस्टम अत्यंत तापमानातही चांगली कामगिरी करू शकतात. या ब्रेक्सच्या साहाय्याने तुम्ही हाय स्पीडमध्येही रेसिंग कारवर चांगले नियंत्रण ठेवून एक सुरक्षित राईड अनुभवू शकतात.