फोटो सौैजन्य- Official website
विना ड्रायव्हरची कार बाजारामध्ये आली आहे. मात्र आता सर्वांना आश्चर्यचकित करणारी फ्लाईंग कार लॉंच होणार आहे. ज्या गोष्टींची कल्पनाचे केली जात होती ते आता शक्य झाले आहे. नवतंत्रज्ञानाच्या जोरावर तज्ञांनी ही कार तयार केली आहे. जगातील पहिली उडणारी कारची निर्मिती झाली आहे. कंपनीकडून तर या कारची अतिरिक्त निर्मिती ही सुरु करण्यात आली. अलेफ एरोनॉटिक्स या कंपनीकडून फ्लाईंग कार बाजारात आणली जाणार आहे. त्यामुळे आता रस्त्यावर प्रवास न करता थेट आकाशात प्रवास सुरु होणार आहे.
अमेरिकेतील अलेफ एरोनॉटिक्स या कंपनीकडून दावा करण्यात येत आहे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात या कारचे प्रोडक्शन करण्यात येईल. मॉडल ए असे कारचे नाव असून ही कार ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी क्रांतीकारी ठरणार आहे. कारच्या आगमनाच्या चर्चा सर्वत्र होत आहे. त्यामुळे ज्यावेळी ही कार ज्यावेळी जागतिक बाजारपेठेत येईल त्यावेळी मोठी खळबळ होणार आहे.
सर्व शंका आणि प्रश्नांवर कंपनीने कारची निर्मिती करत दिले उत्तर
एक वर्षाअगोदर जगातील फ्लाईंग कार बनवत असल्याचा दावा Alef Aeronutics कडून करण्यात आला होता. त्यावेळी अनेक लोकांनी याविषयी शंका उपस्थित केली होती. काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा एक महत्वाकांशी प्रकल्प आहे तर काही लोकांनी तर कारच्या उडण्यावरुन प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या सर्व शंका आणि प्रश्नांवर कंपनीने कारची निर्मिती करत जबरदस्त उत्तर दिले आहे. त्यावेळी या कारची किंमत ही अंदाजे 3 लाख डॉलर म्हणजेच भारतीय रुपयाप्रमाणे अंदाजे 2 कोटी 50 लाखाहून अधिक असू शकते अशी चर्चा करण्यात येत होती.
FAA (Federal Aviation Administration)कडून फ्लाइंग कारला मान्यता
अलेफ एरोनॉटिक्सच्या या फ्लाईंग कारला अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडून विशेष एअरवॉर्थिनेस सर्टिफिकेट देखील मिळाल्याची कंपनीने घोषणा केली आहे. FAA कडून मिळालेल्या प्रमाणपत्रामुळे लोकांचाही फ्लाईंग कारवर विश्वास वाढला आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांना त्यांच्या कार मॉडेल ए साठी आतापर्यंत तब्बल 3200 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. ही कार पूर्णत: इलेक्ट्रीक कार आहे.
या पहिल्या फ्लाईंग कारच्या निर्मितीनंतर कंपनीकडून मॉडेल झेड ही दुसरी कारही निर्मित केली जाणार आहे. कंपनीच्या पहिल्या कारला जगभरात वापरासाठी परवानगी कधी मिळते हे पाहणे महत्वाचे आहे.