फोटो सौजन्य- iStock
आज ऑटोमोबाईल क्षेत्रातमध्ये कमालीचे बदल होत आहे. अत्याधुनिक तंत्र आणि वैशिष्ट्ये असणाऱ्या कार बाजारात येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. नवनवीन तांत्रिक बदलांमुळे वैशिष्टांमध्येही अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. आजच्या काळात कारची किंमत, मायलेजसोबत वैशिष्टांचा विचारही मोठ्या प्रमाणात कार खरेदी करताना ग्राहक करतात. वायरलेस चार्जर, 360 डिग्री कॅमेरा इत्यादी वैशिष्ट्ये आजच्या काळात खूप महत्वाची आहेत. मात्र काही कार वैशिष्ट्ये ही फारशी उपयुक्त नसतात तरीही ग्राहक त्या कार वैशिष्टांसाठी अधिक पैसे खर्च करतात. त्यामुळे त्यांचा तितकासा फायदा होत तर नाही मात्र खर्च खूप होतो. जाणून घेऊया अशा कार वैशिष्टांबद्दल जी कार घेताना तुम्हाला तितकीशी आवश्यक नाही आहेत.
व्हॉईस कमांड
व्हॉईस कंमाड या वैशिष्टाद्वारे तुम्ही कार चालवत असताना आवाजाद्वारे नेव्हिगेशन, कॉलिंग किंवा संगीत नियंत्रित करू शकता. मात्र हे वैशिष्ट्य प्रवाभी ठरत नाही. कारण अनेकदा व्हॉइस कमांड तुम्ही सांगितलेल्या सूचनेचा चुकीचा अर्थ लावतात त्यामुळे अखेर तुम्हाला काम मॅन्युअली करण्यास भाग पडते.
सनरूफ
सध्या कारमध्ये सनरुफ असण्याचा ट्रेंड मोठ्याप्रमाणात वाढत आहे. मात्र पाहायला गेल्यास सनरुफचा वापर हा फार मर्यादित असतो. खरतर युरोपातील थंड देशामध्ये लोक सूर्यप्रकाश घेण्यासाठी सनरुफचा व्यावहारिक वापर करतात. त्यामुळे युरोपातील बहुतांश वाहनांमध्ये सनरुफ असते. मात्र त्याउलट भारतातील बहुतांश लोक सनरुफ हे सूर्यप्रकाश आणि धुळीमुळे ते उघडे ठेवत नाहीत. ते योग्यपद्धतीने न वापरल्यास त्यामुळे सुरक्षेसंबंधीही समस्या निर्माण होऊ शकते.
रेन सेन्सिंग वाइपर
वाइपर हा कारचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामध्ये नवीन फीचर हे रेन सेन्सिंग वायपरचे आहे. यामध्ये सेन्सिंगद्वारे वाइपर आपोआप पावसाचा अंदाज लावतात आणि विंडशील्ड साफ करतात, मात्र हे तितकेसे महत्वाचे वैशिष्ट्य नाही कारण केवळ पावसाळ्याच्या काळात त्यातही पाऊस असेल तर याचा वापर होतो. तुम्ही स्वत: पावसामध्ये मॅन्युअली वायपर सुरु करु शकतात.
स्वयंचलित हेडलाइट्स
ज्यावेळी वाहन चालवताना अंधार पडतो त्यावेळी या स्वयंचलित हेडलाइट्स आपोआप सुरु होतात. एक चांगले वैशिष्ट्य असले तरीही आपण मॅन्युअली लाइट्स सुरु किंवा बंद करु शकतो. ज्यामुळे तुमचे कारवरचे पैसे वाचू शकतात.
जेश्चर कंट्रोल
जेश्चर कंट्रोल या वैशिष्टाद्वारे कोणत्याही बटणाला स्पर्श न करता केवळ हाताच्या हालचालीद्वारे तुम्ही काही फंक्शन्स नियंत्रित करु शकतात. मात्र यात जेश्चर चुकीच्या पद्धतीने वापरल्यास धोका उद्धभवू शकतो. त्यामुळे मॅन्युअली फंक्शन्स नियंत्रित करणे महत्वाचे आहे.
या वैशिष्टांबाबतीमध्ये ग्राहक म्हणून तुम्ही योग्य निर्णय घेतल्यास कारची किंमत ही कमालीची कमी होऊ शकते.