EV स्वस्त होणार? लिथियम बॅटरीत वापरली जाणारी कोबाल्ट पावडर स्वस्त, अर्थमंत्र्यांची घोषणा
इलेक्ट्रिक वाहनांना देशात चांगली मागणी मिळत आहे. पूर्वी ज्या वाहन उत्पादक कंपन्या फक्त इंधनावर चालणारी वाहन उत्पादित करीत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे लक्षकेंद्रित करत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे अनेक गाहक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे लक्षकेंद्रित करत आहे. पण अनेकदा इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळेच यंदाच्या बजेटकडे इलेक्ट्रिक कार खरेदीदारांचे विशेष लक्ष होते.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी महत्वाची घोषणा केली, ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे. काय आहे ती घोषणा, चला जाणून घेऊया.
होंडाच्या ‘या’ कार झाल्या महाग; इतक्या रुपयांनी झाली किमतीत वाढ, नवीन किंमत काय?
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘कोबाल्ट पावडर स्वस्त होणार’ ही महत्वाची घोषणा केली आहे. ही कोबाल्ट पावडर लिथियम बॅटरीमध्ये वापरली जाते. लिथियम बॅटरीचा वापर इलेकट्रोनिक उपकरणं आणि इलेक्ट्रिक वाहनांनामध्ये केला जातो. यामुळे नक्कीच स्मार्टफोन खरेदी करणे आता स्वस्त होणार आहे.
देशातील अनेक इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांचे लक्ष भारताच्या अर्थसंकल्पाकडे लागले होते. EV च्या किंमती कमी होणार की वाढणार, असा प्रश्न वाहन खरेदीदारांना सतावत होता. अशातच, यंदाच्या अर्थसंकल्पाने EV खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे.
आपण सर्वेच जाणतो इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम बॅटरीचा वापर होतो. आता त्या बॅटरीत वापरली जाणारी कोबाल्ट पावडर स्वस्त होणार असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनं देखील स्वस्त होणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम-आयन बॅटरीच्या उत्पादनावरील कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली आहे. आपल्या आठव्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना सीतारामन म्हणाल्या, “सूट दिलेल्या भांडवली वस्तूंच्या यादीत, मी ईव्ही बॅटरी उत्पादनासाठी 35 अतिरिक्त भांडवली वस्तू आणि मोबाईल फोन बॅटरी उत्पादनासाठी २८ अतिरिक्त भांडवली वस्तू जोडण्याचा प्रस्ताव ठेवते. यामुळे मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम-आयन बॅटरीच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल.”
सीतारामन यांनी सौर पीव्ही सेल, ईव्ही बॅटरी, मोटर्स आणि कंट्रोलर्स, इलेक्ट्रोलायझर्स, विंड टर्बाइन, हाय-व्होल्टेज ट्रान्समिशन उपकरणे आणि ग्रिड-स्केल बॅटरीच्या देशांतर्गत उत्पादनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय उत्पादन अभियानाची (National Manufacturing Mission) घोषणा देखील केली.