फोटो सौजन्य- iStock
तुम्ही जर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. एका कंपनीकडून आपल्या कारवर तब्बल 6 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. ती कंपनी आहे मॉरिस गॅरेज. मॉरिस गॅरेज डीलरशिप्सनी जाहीर केले आहे की MG Gloster SUV या कारवर 6 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. MG Gloster SUV ही एसयुव्ही कार थेट टोयोटा फॉर्च्युनर, जीप मेरिडियन आणि स्कोडा कोडियाक यांच्याशी स्पर्धा करते.
जर तुम्हाला एक भव्य एसयूव्ही हवी असल्यास एमजी ग्लोस्टर ही तुमच्याकरिता उत्तम पर्याय असू शकते शिवाय त्यावरील सवलतीमुळे ही कारची किंमत कमी झाली आहे.ग्लोस्टरच्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलची एक्स शो रुम किंमत 38.80 लाख ते 43.87 लाख रुपये आहे.MG Gloster SUV ही कार भारतात 2020 मध्ये लाँच करण्यात आली होती कारची लांबी 4985 मिमी, रुंदी 1926 मिमी, उंची 1867 मिमी, व्हील बेस 2950 मिमी, ग्राउंड क्लिअरन्स 210 मिमी आणि बूट स्पेस 343 मिमी आहे. आणि SUV कारच्या मिड-लाइफ अपडेटमध्ये बरीच वैशिष्ट्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.
फोटो सौजन्य – official Website
MG Gloster SUV ची वैशिष्ट्ये
अंतर्गत भागाबद्दल बोलायचे झाल्यास, पॉवर्ड फ्रंट सीट्स, हवेशीर जागा, सभोवतालची प्रकाश व्यवस्था, उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट आणि प्रीमियम सामग्री आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण या कारमध्ये आहे.सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्ज, ABS EBD ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन किप असिस्ट या घटकांचा समावेश आहे.
एअर प्युरिफायर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, सनरूफ आणि ADAS या तांत्रिक बाबींचा समावेश कारमध्ये केला गेला आहे. कारची इतर वैशिष्ट्यांमध्ये उष्णता शोषणारी विंडशील्ड, गरम केलेले आरसे आणि PM 2.5 फिल्टर इत्यादी घटक आहेत.
ग्लोस्टर फेसलिफ्ट मॅक्सस डी90 वर आधारित असणार आहे. MG Gloster फेसलिफ्ट ही D90 ची रीबॅज केलेली आवृत्ती असणार आहे जिची रचना ही सारखी असणार आहे. कंपनीकडून 11 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात Windsor EV लाँच करणार आहे आणि त्यापूर्वी कंपनी मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.
MG Gloster SUV या कारची सवलत ही डीलरशीपनुसार बदलू शकते त्यामुळे निश्चित सवलत किंमत जाणून घेण्यासाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधावा.