hero-electric-photon-lp-1
दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) अवजड उद्योग मंत्रालयातर्फे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. EMPS चे बजेट 500 कोटी रुपयावरून वाढवून ते रु. 778 कोटी करण्यात आले आहे. या योजनेत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी 10,000 आणि रुपये अनुदान देण्यात येते तर इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरसाठी 50,000 रुपये अनुदान दिले जाते. ज्या कंपन्या EMPS साठी नोंदणीकृत आहेत त्यांना स्थानिकीकरण नियमांचे पालन करावे लागेल.
विक्रीवाढीचे लक्ष्य
EMPS अंतर्गत विक्रीचे लक्ष्य 3.72 लाखांवरून 5.61 लाख युनिट्सवर नेण्यात आले आहे. या विक्री लक्ष्यात 5 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि 60,000 इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. यामुळे सरकारकडून इलेक्ट्रीक टू व्हीलर्स आणि थ्री व्हीलर्सना प्रोत्साहन देण्याचा उद्दिष्ट आहे.
EV ग्राहक, डीलर्स आणि उत्पादकांना तात्पुरता दिलासा
EMPS या योजनेचा लाभ घेणारे काही प्रमुख ब्रँड्समध्ये Ather Energy, Bajaj Auto, Hero MotoCorp, TVS इत्यादींचा समावेश होतो. FAME-II ही योजना 31 मार्च 2024 रोजी संपली. त्यानंतर EMPS योजना ही 31 जुलै 2024 पर्यंत निर्धारित करण्यात आली होती. मात्र अपेक्षेनुसार अवजड उद्योग मंत्रालयाने याचा कालावधी वाढविला आहे. या दोन महिन्यांच्या विस्तारामुळे EV ग्राहक, डीलर्स आणि उत्पादकांना तात्पुरता दिलासा मिळेल. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अनुदाने FAME-II अंतर्गत ऑफर केलेल्या निम्म्या आहेत, काही बाबतीत कमी आहेत.
30 सप्टेंबर 2024 रोजी EMPS संपल्यानंतर, इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या किमती वाढणार आहे. त्यामुळे त्याचा ईव्हीच्या विक्रीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकांना ईलेक्ट्रीक टू व्हीलर्स आणि थ्री व्हीलर्स घायचे आहे त्यांनी या अनुदान कालावधी वाढीचा विचार करा.