फोटो सौजन्य: YouTube
जसे हे जग प्रगत होत आहे, तसेच नवनवे तंत्रज्ञान उदयास येत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राची सुद्धा भरभराट होत आहे. आधी आपण इलेक्ट्रिक कार्स पाहिल्या, मग ई-बाईक्स आणि स्कुटरस पाहत आहोत. आता तर ई-सायकल सुद्धा मार्केटमध्ये येऊ लागल्या आहेत. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता बाईक चालवताना गिअर बदलायची गरज नाही तर? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण यमाहा कंपनी हे सत्यात उतरवत आहे.
यमाहा (Yamaha) कंपनीने भारतीय कार मार्केटमध्ये आपल्या अनेक स्पोर्ट्स बाईक आणल्या आहेत. ग्राहकांनी सुद्धा या बाईक्सला चांगला प्रतिसाद दिला आहे. आता यमाहा एक नवे तंत्रज्ञान आणायच्या तयारीत आहे, ज्यात बाईक चालवताना तुम्हाला गिअर बदलायची गरज भासणार नाही. तसेच कंपनी हे नवे तंत्रज्ञान आपल्या बाइक्समध्ये सुद्धा समाविष्ट करणार आहे.
यमाहा आपल्या आगामी नवीन बाइक्समध्ये Y-AMT तंत्रज्ञान वापरू शकते. या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने बाईक चालवण्याचा अनुभव अधिकच सोपा होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने बाईकमध्ये वारंवार गीअर्स बदलण्याची गरज भासणार नाही. एकदा तुम्ही गिअर टाकल्यानंतर, तुम्ही तुमची बाईक कुठेही न थांबता चालवू शकता.
माहितीनुसार, यमाहा MT-09 या सेमी नेकेड बाईकमध्ये पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. ही बाईक लाँच केल्यानंतर, कंपनी हे फीचर आपल्या इतर सुपर बाइक्समध्ये देखील जोडू शकते.
Yamaha ने या वर्षी म्हणजेच जून 2024 मध्ये त्यांचे Y-AMT तंत्रज्ञान सादर केले होते. सध्या हे तंत्रज्ञान फक्त जपानमध्ये वापरले जाईल. परंतु काही काळानंतर ते इतर देशांमध्ये देखील दिले वापरले जाऊ शकते.
जर तुमची बाईक जास्त वेगाने धावत असेल आणि अचानक तुम्हाला वेग कमी करावा लागला तर या तंत्रज्ञानात मॅन्युअल गिअर बदलण्याचा देखील पर्याय दिला जाईल. यामुळे बाइक चालवण्याचा अनुभव मोठ्या प्रमाणात बदलला जाईल.