फोेटो सौजन्य: Social Media
महिंद्रा कंपनी सध्या मार्केटमध्ये खूप चर्चेत आहे याचे कारण म्हणजे कंपनीने देशातील बलाढ्य टाटा कंपनी ऑटो कंपनी टाटा मोटर्सला मागे सारून भारतातील तिसरी सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी बनली आहे. तसेच कंपनीच्या विक्रीत सुद्धा आपल्याला सतत वाढ पाहायला मिळत आहे.
ऑगस्टमध्ये कंपनीने Mahindra Thar Roxx ही आपली दमदार एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच केली होती. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर कंपनीने या एसयूव्हीची बुकिंग चालू केली आहे. या कारच्या बुकिंगला मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
महिंद्राला देशभरातून Thar Roxx साठी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने 3 ऑक्टोबरपासूनच बुकिंग सुरू केले. यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून बुकिंग सुरू करण्यात आले. त्यानंतर अवघ्या एका तासात या एसयूव्हीच्या 176218 युनिट्सची बुकिंग झाली आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून या एसयूव्हीची बुकिंग महिंद्राने सुरू केली आहे, मात्र त्याची डिलिव्हरी 12 ऑक्टोबरपासून म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापासून सुरू होईल. चला आता या कारच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.
महिंद्रा थार रॉक्समध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग्ज, साइड आणि कर्टेन एअरबॅग्ज, टीपीएमएस, पार्किंग सेन्सर्स, मागील कॅमेरा, ई-कॉल, एसओएस, रिअर डिस्क ब्रेक, ईएससी, ईबीडी, एबीएस, हिल होल्ड, ईएसएस, ॲड्रेनॉक्स कनेक्टेड कार, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, 26.03 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टीम, 26.03 सेमी एचडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, सराउंड व्ह्यू कॅमेरा, लेव्हल-2 ADAS, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटो टेम्परेचर कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, ऑटो हेडलॅम्प्स,आणि असे अनेक फीचर्स देण्यात आले आहे.
महिंद्राने Thar Roxx मध्ये दोन इंजिन ऑप्शन दिले आहेत. ज्यामध्ये दोन लिटर क्षमतेचे (TGDI), mStallion (RWD) आणि 2.2 लिटर क्षमतेचे mHawk (RWD आणि 4×4) इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. दोन लिटर इंजिनमधून, याला मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 119 kW पॉवर आणि 330 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. तर 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर 130 kW पॉवर आणि 380 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करतो. 2.2 लीटर इंजिन पर्याय मॅन्युअल ट्रान्समिशनसह 111.9 kW पॉवर आणि 330 न्यूटन मीटर टॉर्क, 111.9 आणि 128.6 kW पॉवर आणि 6 स्पीड ऑटोमॅटिकसह 330 आणि 370 न्यूटन मीटर टॉर्क ऑफर करतो.
कंपनीने ही थार रॉक्स सहा व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. त्याच्या 2WD व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 20.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्या फोर-व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 18.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या फोर-व्हील ड्राइव्हचा टॉप व्हेरिएंट 20.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर खरेदी केले जाऊ शकते.