फोटो सौजन्य: Social Media
हिरो मोटोकॉर्प ही जगातील बाईक्स व स्कूटर्सची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. तसेच थम्स अप ही कोका-कोला कंपनी अंतर्गत भारतातील सर्वात मोठा स्वदेशी बेव्हरेज ब्रँड आहे. या दोन्ही कंपनीज हिरो मोटोकॉर्पची फ्लॅगशिप मोटरसायकल मॅव्हरिक 440 ची लिमिटेड-एडिशन व्हर्जन मॅव्हरिक 440 थंडरव्हील्स लाँच करण्यासाठी एकत्र आले आहेत.
हिरो मोटोकॉर्पसोबत सहयोगाने बारकाईने डिझाइन करण्यात आलेल्या बाईक्सच्या या विशेष सिरीजमधून थम्स अपची मुलभूत मूल्ये साहस व रोमांच, तसेच हिरोच्या तंत्रज्ञान क्षमता आणि अभियांत्रिकी सर्वोत्तमता दिसून येतात. दोन्ही ब्रँड्स तरूण ग्राहकांना दर्जात्मक तूफानी अनुभव देण्यासाठी पार्टनरशिप करत आहेत. मॅव्हरिक 440 थंडरव्हील्स दोन्ही ब्रँड्सच्या अपेक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी, तसेच साहसी व रोमांचक प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही लिमिटेड-एडिशन मोटरसायकल फक्त 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत थम्स अपचे स्पेशल एडिशन पॅक्स खरेदी करून स्कॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.
उत्साहवर्धक जाहिरातीसह या मोहिमेला सुरूवात झाली आहे. या जाहिरातीमध्ये थम्स अपचे ब्रँड अॅम्बेसेडर्स आणि भारताचे सर्वात नीडर क्रिकेट आयकॉन्स जसप्रीत बुमराह व रिषभ पंत आहेत. ही टीव्हीसी ब्रँडच्या उत्साहवर्धक पैलूला परिपूर्णपणे कॅप्चर करते आणि प्रत्येक ट्विस्ट व वळणासह मॅव्हरिक 440 थंडरव्हील्सची अचूकता व क्षमतेला दाखवते.
या पार्टनरशिपबाबत मत व्यक्त करताना हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बीयूचे चीफ बिझनेस ऑफिसर रणजीवजीत सिंग म्हणाले, ”ही अद्वितीय पार्टनरशिप सेगमेंटमध्ये गेमचेंजर ठरेल. दोन प्रतिष्ठित ब्रँड्सच्या सहयोगामधून ग्राहकांसाठी अद्वितीय उत्पादन सादर करण्यात आले आहे. आमची फ्लॅगशिप मॅव्हरिक 440 मोटरसायकलच्या मिड-व्हेरियंटवर आधारित मॅव्हरिक 440 थंडरव्हील्समधून उत्पादनाची मूल्ये अस्सलता, स्वावलंबीपणा, आकर्षकता व साहसीपणा दिसून येतो, जी थम्स अपच्या पैलूंशी परिपूर्णपणे संलग्न आहेत. थम्स अपमधून प्रेरित नवीन रंग आणि ग्राफिक्स या बाईकला इतरांपेक्षा वरचढ ठरवतात, ज्यामुळे ही बाइक निश्चितच देशभरातील तरूणांचे लक्ष वेधून घेईल.
हे देखील वाचा: Automatic की Manual, कोणत्या गिअर वाली कार आहे जास्त Powerful?
या लाँचबाबत मत व्यक्त करत कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्ट एशियाच्या विपणन विभागाच्या उपाध्यक्ष ग्रीष्मा सिंग म्हणाल्या, ”आम्हाला मॅव्हरिक 440 थंडरव्हील्स लाँच करण्यासाठी हिरो मोटोकॉर्पसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. नाविन्यता आणि थम्स अपचा साहसी उत्साह समाविष्ट असलेल्या या बाईकमधून रोमांचक अनुभवाला प्रत्यक्षात आणण्याप्रती आमची एकत्रित आवड दिसून येते.
या नवीन स्पेशल एडिशन बाईकची किंमत 1.99 लाखांपासून सुरु होते, जी 2.24 पर्यंत जाऊ शकते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.