फोटो सौजन्य: Social Media
हिरो मोटोकॉर्प आपल्या उत्तम आणि बजेट फ्रेंडली बाईक्समुळे ओळखली जाते. नुकताच कंपनीने आपल्या भविष्यात्मक दृष्टिकोन ईआयसीएमए 2024 सादर केला आहे. बी द फ्यूचर ऑफ मोबिलिटी’ या आपल्या दृष्टिकोनाशी बांधील राहत हिरो मोटोकॉर्पचा मर्यादांना दूर करण्याचा आणि नवकल्पना व शाश्वततेमध्ये नवीन मानक स्थापित करण्याचा मनसुबा आहे.
जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी म्हणून हिरो मोटोकॉर्प ‘इनोव्हेटिंग अॅण्ड मेकिंग इन इंडिया फॉर वर्ल्ड’ या तत्त्वाप्रती बांधील आहे. या तत्त्वामधून कंपनीच्या कार्यसंचालनांचे प्रत्येक पैलू दिसून येतात, 120 दशलक्ष ग्राहकांना सेवा देण्याप्रती कंपनीची कमिटमेंट अधिक दृढ होते, तसेच पर्यावरणीय स्थिरतेवरील भर कायम राहतो.
हिरो मोटोकॉर्प विश्वसनीय जागतिक अग्रणी कंपनी आहे, जी मशिन्सची विश्वसनीयता व स्थिरतेसाठी ओळखली जाते. यामुळेच जागतिक दर्जाची उत्पादने दृढ पाया निर्माण करतात, जेथे हिरो युरोप व यूकेमध्ये विस्तार करत आहोत.
हिरो चार जागतिक दर्जाच्या उत्पादनांचे अनावरण करण्यास उत्सुक आहे. प्रत्येक उत्पादनाची विशिष्ट जागतिक ओळख आहे, तसेच प्रत्येक उत्पादनामध्ये कॅटेगरी-लीडिंग फिचर, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रख्यात अभियांत्रिकी सर्वोत्तमता आहे, जी हिरो मोटोकॉर्पला नव्या उंचीवर घेऊन जाते.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. पवन मुंजाल कार्यकारी अध्यक्ष, हिरो मोटोकॉर्प यांनी आपले काही विचार मांडले आहे. ते म्हणतात,”हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने ईआयसीएमए 2024 येथे उत्साहवर्धक व बहुप्रतिक्षित नवीन मोटरसायकल्स आणि इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजचे अनावरण केले. कंपनीने 2025 च्या उत्तरार्धात विविध युरोपियन आणि यूके बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या योजनांची घोषणा केली.
हे देखील वाचा: Kia च्या ‘या’ कारचे होणार लॉंचिग, Mahindra XUV700 ला देणार जोरदार टक्कर
प्रीमियमाझेशनचा प्रवास सुरू ठेवत आणि नवीन रेंजमध्ये आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत हिरो मोटोकॉर्पने तीन नवीन मोटरसायकल्सचे अनावरण केले. एक्सपल्स 210, एक्स्ट्रीम 250आर आणि करिझ्मा एक्सएमआर 250 असे या बाईक्सचे नाव आहे.
या वैविध्यपूर्ण मोटरसायकल श्रेणी ऑफ-रोड/ अॅडवेन्चर ते स्ट्रीट व ट्रॅकपर्यंत विविध राइडिंग स्टाइल्स व रस्त्यांवरील ड्रायव्हिंगची पूर्तता करते. तसेच व्हिडा झेड इलेक्ट्रिक स्कूटर पर्यावरणाप्रती जागरूक ग्राहकांना स्टाइल व कार्यक्षमतेचा अनुभव देते.
2025 च्या उत्तरार्धापर्यंत युरोप व यूकेमध्ये व्यावसायिक कार्यसंचालनांचा विस्तार करण्याच्या ध्येयासह हिरो मोटोकॉर्प नवीन इलेक्ट्रिक स्कूटर व्हिडा झेड लाँच करत बाजारपेठांमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच, कंपनीची आपली रेंज उच्च क्षमतेच्या प्रीमियम इंटर्नल कम्बशन इंजिन (आयसीई) मोटरसायकल्सपर्यंत विस्तारित करण्याची योजना आहे. कंपनीची विद्यमान व नवीन उत्पादन युरोपियन बाजारपेठांच्या विद्यमान आणि भावी गरजांची योग्यरित्या पूर्तता करेल.