फक्त 7.89 लाखात लाँच झाली Skoda ची ही जबरदस्त एसयूव्ही, ॲडव्हान्स फिचर्स सोबत मिळणार सुरक्षेची हमी
ग्राहकांची वाढती मागणी आणि बदलत्या अपेक्षांमुळे, ऑटो कंपनीज दमदार कार्स लाँच करत आहे. यातही इलेक्ट्रिक कार्स आणि एसयूव्ही मोठ्या प्रमाणत लाँच होताना दिसत आहे. यातही एकीकडे इलेक्ट्रिक कार लाँच होत असताना देखील एसयूव्हीच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच अनेक कंपनी दमदार एसयूव्ही मार्केटमध्ये आणत आहेत.
भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन Skoda Kylaq ची रचना करण्यात आली आहे. ही खास विकसित सब-फोर-मीटर एसयूव्ही आहे. कार अधिकृतपणे 7.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लाँच करण्यात आली आहे. याची बुकिंग 2 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. त्याच वेळी, या SUV ची डिलिव्हरी मिळवण्यासाठी लोकांना 27 जानेवारी 2025 पर्यंत वाट पाहावी लागेल. त्यानंतर कंपनी SUV ची डिलिव्हरी सुरू करेल. चला या नवीन कारची खासियत जाणून घेऊया.
हे देखील वाचा; Kia च्या ‘या’ कारचे होणार लॉंचिग, Mahindra XUV700 ला देणार जोरदार टक्कर
नवीन Skoda Kylaq दिसायला Kushaq सारखी आहे, ज्याचा पुढचा आणि मागचा भाग अगदी सारखाच आहे. या कारमध्ये 17 इंची अलॉय व्हील्स देखील उपलब्ध आहेत. याचे डिझाइन अशा पद्धतीने केले आहे की ही कार प्रत्येकांना आकर्षित करेल. ही SUV कमी बजेटच्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
नवीन Skoda Kylaq च्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर ते अनेक प्रगत फीचर्सनी सुसज्ज आहे. त्याच्या मुख्य फीचर्समध्ये ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि 6-स्पीकर कँटन साउंड सिस्टीम यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर ही SUV अनेक चांगल्या सेफ्टी फीचर्सने सुसज्ज आहे. नवीन Skoda Kylaq चे सर्व व्हेरियंट 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल प्रोग्राम आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, हेडरेस्ट आणि सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट यांसारख्या फीचर्ससह येतात.
कॉम्पॅक्ट SUV नवीन Skoda Kylaq 3.95 मीटर लांब आहे. त्याचा व्हीलबेस 2.56 मीटर आहे. याशिवाय यात 189 मि.मी. ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. बूट स्पेसबद्दल बोलायचे झाले तर ते 446 लिटर आहे, जे सीट्स कमी करून 1,265 लिटरपर्यंत वाढवता येते.
नवीन Skoda Kylaq स्कोडाच्या 1.0-लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सादर केले जाईल, जे 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड MT किंवा 6-स्पीड AT सह येईल.
Skoda साठी ही ही एक अतिशय महत्त्वाची SUV आहे, कारण कंपनी जवळपास एक दशकानंतर 10 लाख बजेट सेगमेंटमध्ये परत येत आहे. नवीन Kylak कंपनीच्या व्हॉल्यूमचा विस्तार करेल व टियर 3 आणि टियर 4 मार्केटमध्ये पोहोचेल जिथे ते सध्या फारसे ॲक्टिव्ह नाही आहे.
नवीन Skoda Kylaq च्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra यांचा समावेश आहे.