Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार

भारतात मायलेज बाईक म्हटलं की अनेकांच्या नजरेसमोर Hero Splendor येते. मात्र, एक बाईक अशी देखील आहे जी मायलेजमध्ये स्प्लेंडरला मागे टाकते. विशेष म्हणजे या बाईकची किंमत 65 हजार रुपये आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 05:17 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतीय बाजारात बजेट फ्रेंडली बाईकला चांगली मागणी
  • Honda Shine 100 देते दमदार मायलेज
  • जाणून घ्या फीचर्स
भारतीय ग्राहक नेहमीच अशा बाईकच्या शोधात असतात, जी त्यांना स्वस्त किमतीत उत्तम मायलेज देईल. ग्राहकांच्या याच मागणीकडे पूर्ण लक्ष देत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार बाईक ऑफर करत असतात.

भारतीय ऑटो बाजारात कम्युटर बाईक सेगमेंट वेगाने लोकप्रिय होताना दिसत आहे. परवडणाऱ्या किमती आणि उत्कृष्ट मायलेज असलेल्या बाईक दैनंदिन प्रवासासाठी योग्य असतात, जेणेकरून अनेक ग्राहक या बाईक खरेदी करतात. अशीच एक बाईक म्हणजे Honda Shine, जी थेट Hero Splendor Plus शी स्पर्धा करते. चला या बाईकची माहिती जाणून घेऊया.

मध्यम वर्गीय ग्राहकांसाठी ‘या’ Diesel SUV आहेत एकदम परफेक्ट! किंमत आणि फीचर्सवर एकदा नजर टाकाच

होंडा शाइन 100 ची किंमत

होंडा शाइन 100 ची किंमत 65,243 (एक्स-शोरूम) आहे, तर त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 77,111 रुपये आहे. शहरानुसार किंमत थोडीशी बदलू शकते, तरीही ती हिरो स्प्लेंडर प्लसपेक्षा सुमारे दहा हजार रुपयांपेक्षा स्वस्त आहे. बजेट खरेदीदारांसाठी हा एक महत्त्वाचा फायदा आहे, कारण त्यांना कमी किमतीत होंडाची गुणवत्ता आणि विश्वासार्ह कामगिरी मिळते.

Honda Shine 100 ची पॉवर

होंडा शाइन 100 मध्ये 98.98cc क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमध्ये PGM-FI आणि eSP तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 7.38 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते, जे शहरातील दैनंदिन वापरासाठी योग्य ठरते. या बाईकमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून, ट्रॅफिकमध्ये स्मूथ आणि झटकेरहित रायडिंगचा अनुभव मिळतो. अवघे 99 किलो वजन असल्याने ही बाईक हाताळणे सोपे आहे. तसेच 85 किमी प्रतितास टॉप स्पीडमुळे ती संतुलित कम्युटर बाईक म्हणून ओळखली जाते.

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

मायलेज

होंडा शाइन 100 ची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तिचे उत्कृष्ट मायलेज. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक 65 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते. अनेक रायडर्सना प्रत्यक्षात 65 ते 68 किमी प्रति लिटरपर्यंत सरासरी मिळत असल्याचे दिसून आले आहे. 9 लिटर क्षमतेचा फ्यूल टँक आणि eSP तंत्रज्ञानासह मिळणारे आयडल स्टार्ट-स्टॉप फीचर यामुळे इंधनाची बचत अधिक होते आणि ही बाईक अधिक किफायतशीर ठरते.

मेंटेनन्स खर्च

मेंटेनन्सच्या बाबतीतही होंडा शाइन 100 ग्राहकांसाठी परवडणारी आहे. याचा सर्व्हिस खर्च साधारणपणे 800 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान असतो. याशिवाय कंपनीकडून 3 वर्षे किंवा 42,000 किमीपर्यंतची वॉरंटी दिली जाते. त्यामुळे दीर्घकाळ कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय वापरता येणारी ही विश्वासार्ह कम्युटर बाईक ठरते.

Web Title: Hero splendor rival honda shine best mileage bike know price and power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero MotoCorp
  • Honda

संबंधित बातम्या

शेतात राजा, हायवेवर वजीर! ट्रॅक्टर चालवण्यासाठी ‘स्पेशल’ लायसन्स लागतं का? जाणून घ्या कायदेशीर नियम
1

शेतात राजा, हायवेवर वजीर! ट्रॅक्टर चालवण्यासाठी ‘स्पेशल’ लायसन्स लागतं का? जाणून घ्या कायदेशीर नियम

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या
2

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?
3

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!
4

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.