(Splendor फोटो सौजन्य-ट्विटर)
देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माण करणाऱ्या Hero MotoCorp कंपनीने आपल्या पोर्टफोलियो मध्ये असणाऱ्या सगळ्याच स्कूटर आणि बाइक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. या दरवाढीचा फटका नक्कीच सर्वसामान्यांना होणार असल्याचे दिसत आहे. चला जाणून घेऊया नेमकं किती रुपयांनी बाइक्स आणि स्कूटरच्या किंमतीत वाढ झाली आहे.
हीरो मोटोकॉर्प या कंपनीने त्याच्या पोर्टफोलियो मध्ये असणाऱ्या सर्वच दुचाकींची किंमत वाढवली आहे. जून मध्ये कंपनीने दुचाकींच्या किमती वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. सतत वाढणारी इनपुट कॉस्टमुळे हिरो समूहाने ही दरवाढ करणायचं निर्णय घेतला होता. आजपासून Splendor, Passion ह्या बाइक्स सोबत Destini, Xoom सारख्या स्कूटर्स सुद्धा महाग झाल्या आहेत.
हीरो मोटोकॉर्प कंपनीकडून १ जुलै २०२४ पासून प्रत्येक वाहनांच्या किमतीत १५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परंतु मॉडेल आणि वेरिएंटच्या किंमती एक सारख्या वाढवल्या जाणार नाहीत. याउलट प्रत्येक मॉडेल आणि वेरिएंटच्या किंमतीत वेगवेगळी वाढ करण्यात येईल.
हीरो मोटोकॉर्प कंपनीच्या पोर्टफोलिओ स्वस्त बाइक्स बरोबर प्रीमियम आणि स्पोर्ट बाइक्सचा देखील समावेश आहे. या बाइक्स सेगमेंट मध्ये Splendor+, Splendor + Xtec, Splendor+ Xtec2.0, HF Deluxe, HF100, Glamour, Passion Xtec, Super Splendor Xtec, Passion+, Super Splendor, Glamour Xtec, Xtreme 160R 4V, Xtreme 160R, Xtreme 200S 4V, Xtreme 125R, Xpulse 200 4V, Xpulse 200T 4V समावेश आहे. तसेच स्कूटर सेगमेंट मध्ये Destini Prime, Pleasure+ Xtec18, Xoom, Destini 125Xtec ह्या उत्तमोत्तम स्कूटरचा समावेश आहे.