फोटो सौजन्य: YouTube
सध्या जगभरात अनेक अत्याधुनिक कार्स लाँच होताना दिसत आहे. या कार्स फक्त फीचर्स ने अत्याधुनिक नसून लूकने सुद्धा अत्याधुनिक आहे. लक्झरी आणि नवीन फीचर्स असणाऱ्या कार्स नेहमीच कारप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरत असतात.
आज जगात अनेक सुपर लक्झरी कार आहेत. या कार लोकांना आरामदायी तसेच सहज ड्रायव्हिंग सुविधा देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की पुढच्या 100 वर्षात कार्सचे काय भविष्य असेल? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला BMW कंपनीने दिले आहे.
हे देखील वाचा:BMW CE 02 लाँच होण्याआधीच सुरु झाली बुकिंग, जाणून घ्या फीचर्स
बीएमडब्ल्यू ग्रुपने एक कार तयार केली आहे जी पुढील 100 वर्षांच्या कार्सचे भविष्य असेल. BMW ने म्युनिक ते बीजिंग आणि लंडन ते लॉस एंजेलिस पर्यंत जगातील अनेक देशांमध्ये ही कार सादर केली. BMW VISION Next 100 असे या कारचे नाव आहे.
ही BMW कार त्या आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे जी केवळ लोकांच्या स्वप्नात उपलब्ध आहे. या आलिशान कारमध्ये चार जणांसाठी बसण्याची सोय आहे. या बीएमडब्ल्यू कारचे दरवाजे कारबाहेर हात हलवल्यानेच उघडतात, कारण या कारमध्ये सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे. या संपूर्ण कारमध्ये एकच सोनेरी रंग आहे, ज्यामुळे ती सोन्याच्या महालासारखी दिसते.
ही बीएमडब्ल्यू कार चालताना स्ट्रेच होते. या कारच्या शरीरावर गाडीचे टायरही झाकले आहेत. या कारचे टायर हलत असतानाही दिसत नाहीत. या कारचा लूक खूपच डॅशिंग आणि चमकदार आहे. या कारचे आरसे देखील फक्त सोनेरी रंगात देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा: कारला आग लागो की चोरी होवो, ‘अशाप्रकारे’ मिळवा विमा कंपनींकडून पूर्ण रिफंड
BMW ने बनवलेली ही कार ड्रायव्हरच्या सूचनेवरच पुढे जाईल. या कारमध्ये दिसणारे स्टीयरिंग व्हीलही गायब होते. फक्त BMW लोगो दाबल्याने, स्टीयरिंग व्हील कारच्या आत जाते आणि आवश्यकतेनुसार बाहेर देखील आणले जाऊ शकते. या भावी कारच्या डॅशबोर्डला क्लासी लूक देण्यात आला आहे. या कारच्या डॅशबोर्डवर हात ठेवताच गाडी आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो.