फोटो सौजन्य: YouTube
आपल्या देशात जेवढ्या लक्झरी कार्सबद्दल क्रेझ आहे तेवढीच क्रेझ स्कुटरबद्दल सुद्धा आहे. आणि जर ती स्कुटर बीएमडब्ल्यूची असेल तर नक्कीच त्याची चर्चा होणं साहजिकच आहे. बीएमडब्ल्यू ही अशा वाहन उत्पादक कंपनी आहे जिच्या कार्स असो की बाईक्स, त्यांची चर्चा नेहमीच होताना दिसत असते.
आता लवकरच कंपनी आपल्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटर CE 02 लाँच करणार आहे. पण ही स्कुटर लाँच होण्यापूर्वीच कंपनीने याची बुकिंग सुरु केली आहे. CE 04 नंतर ही कंपनीची भारतातील दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जे BMW CE 02 खरेदी करण्याची योजना आखत आहेत.
तुम्ही जवळच्या अधिकृत BMW Motorrad डीलरशिपला भेट देऊ शकतात आणि ही स्कुटर लाँच होण्यापूर्वी ती बुक करू शकतात. ही स्कूटर भारतात कोणत्या तारखेला दाखल होईल आणि ती कोणत्या फीचर्ससह येईल त्याबद्दल जाणून घेऊया.
BMW CE 02 लाँच होण्याआधी एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यानुसार, ही स्कुटर अतिशय आकर्षक डिझाइन, मिनिमलिस्ट बॉडीवर्क, सिंगल-पीस फ्लॅट सीट, एक एलईडी हेडलॅम्प, एक लहान व्हिझर आणि गोल्डन अपसाइड-डाउन (USD) फ्रंट फोर्कसह येणार आहे. एवढेच नाही तर या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह ३.५-इंचाचा टीएफटी डिस्प्ले, कीलेस राइड, ऑटोमॅटिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रिक रिव्हर्स गियर, सिंगल-चॅनल एबीएस आणि यूएसबी-सी चार्जिंग यांसारखी फीचर्स देखील आहेत.
जागतिक बाजारपेठेत उपलब्ध BMW CE 02 1.96kWh च्या दोन काढता येण्याजोग्या बॅटरीसह येते, ज्या एअर-कूल्ड सिंक्रोनस मोटरला पॉवर पाठवतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लावलेली बॅटरी 15bhp आणि 55Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. एका बॅटरीसह ही स्कूटर 45 किमी पर्यंत प्रवास करू शकते आणि तिचा टॉप स्पीड 45 किमी/तास आहे. त्याच वेळी, ट्विन-बॅटरी सेटअप 95 किमी/ताशी उच्च गतीसह 90 किमीची रेंज देते.
ही इलेक्ट्रिक स्कूटर 0.9kW चार्जरने 5 तास 12 मिनिटांत 0% ते 100% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. तेच, 1.5kW फास्ट चार्जरसह, पूर्ण चार्जिंगसाठी वेळ 3 तास 30 मिनिटांपर्यंत कमी केला जातो.
रिपोर्ट्सनुसार, भारतात लाँच होणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढच्या बाजूला USD फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक असेल, तर ब्रेकिंग सेटअप 239 मिमी फ्रंट डिस्क आणि 220 मिमी मागील डिस्क दिले जाऊ शकते.
टीव्हीएसच्या सहकार्याने विकसित केलेली ही BMW ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. भारतात या महिन्यात ही लाँच होणार आहे. या स्कूटरची किंमत 4 लाख ते 5 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.