फोटो सौजन्य: Freepik
आजच्या घडीला कार असणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच तिचे इन्शुरन्स असणे सुद्धा महत्वाचे आहे. हे इन्शुरन्स तुम्हाला आपत्कालीन स्थितीत फायदेशीर ठरू शकते. परंतु काही वेळेस, अनेकांना ठाऊकच नसते की आपला हा कार इन्शुरन्स क्लेम कसा करतात. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. तसेच जर तुमच्याकडे पूर्ण रिफंड असणारी कार इन्शुरन्स पॉलिसी असून देखील तुमचा केलं नाकारला जात असेल तर तर त्यामागील कारण काय असू शकते, हे सुद्धा जाणून घेऊया.
चोरटे कधी आणि कोणती कार चोरले हे कोणालाच माहीत नाही. कार चोरीला गेल्यानंतर, कार विमा कंपनी IDV म्हणजेच इंश्योर्ड डिक्लेयर्ड व्हॅल्यू कार मालकाला देते, परंतु ऑन-रोड किंमत आणि IDV मूल्य यामध्ये लाखो रुपयांचा फरक असतो. चला तर आग जाणून घेऊया, जर तुमची कार चोरीला गेली किंवा आग लागली, तर तुम्ही विमा कंपनीकडून IDV व्हॅल्यूऐवजी संपूर्ण ऑन-रोड किंमतीचा दावा कसा करू शकता?
RTI म्हणजे काय?
तुम्ही तुमच्या कारची संपूर्ण ऑन-रोड किंमत कशी मिळवू शकता हे जाणून घेण्यापूर्वी, RTI (रिटर्न टू इनव्हॉइस पॉलिसी) म्हणजे काय ते जाणून घ्या. आरटीआय ही एक विमा पॉलिसी आहे ज्यामध्ये कंपनी ग्राहकांना मूल्य (ऑन-रोड) देते. ही किंमत ग्राहक कार खरेदी करण्यासाठी वापरतात.
आरटीआय ॲड-ऑन पॉलिसी घ्या
चोरी किंवा आग लागल्यास तुम्हाला तुमच्या कारचे संपूर्ण ऑन-रोड व्हॅल्यू मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही RTI ॲड-ऑन पॉलिसी घेणे आवश्यक आहे. जर कार मालकाकडे रिटर्न टू इनव्हॉइस पॉलिसी असेल तर चोरी किंवा कारला आग लागल्यास कंपनी कार मालकाला संपूर्ण ऑन-रोड किंमत देते. संपूर्ण ऑन-रोड किंमत मिळविण्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणे फार आवश्यक आहे.
इतक्या वर्षापर्यंत मिळू शकतो लाभ
नवीन कार खरेदी केल्यानंतर फक्त तीन वर्षांसाठी आरटीआय ॲड-ऑन पॉलिसी घेता येते. त्याच वेळी, अशा काही कंपनीज आहेत ज्या कार मालकाला 3 ते 5 वर्षांसाठी रिटर्न टू इनव्हॉइस पॉलिसी ऑफर करतात. अनेक सरकारी विमा कंपनीज मालकाला कारची फक्त एक्स-शोरूम किंमत देतात, तर काही खाजगी विमा कंपनी ग्राहकांना आरटीओ, विमा आणि इतर खर्च जोडल्यानंतर ऑन-रोड किंमत देतात.
केव्हा क्लेम नाकारला जातो?
आरटीआय पॉलिसी असूनही कोणत्या परिस्थितीत दावा नाकारला जाऊ शकतो हे देखील तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. समजा तुमच्या कारचा एखादा भाग दोन वर्षांनी खराब झाला आणि तो भाग तुम्ही स्थानिक मेकॅनिककडून बसवून घेता. पुढे जर या लोकल भागामुळे कारला आग लागली, तर मग आरटीआय पॉलिसी घेऊनही तुम्हाला विमा कंपनीकडून पैसे मिळणार नाहीत.