फोटो सौजन्य: iStcok
सध्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक बाईक्स लाँच होताना दिसत आहे. आता इलेक्ट्रिक बाईक्स सुद्धा लाँच होत आहे. सध्या देशात अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज आहे, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार नवीन बाईक्स मार्केटमध्ये आणत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे हिरो मोटोकॉर्प.
हीरो मोटोकॉर्प ही आपल्या उत्तम आणि परवडणाऱ्या बाईक्ससाठी ओळखली जाते. सध्या कंपनीने 100 आणि 125 सीसी असणाऱ्या बाईक्स मार्केटमध्ये आणल्या आहेत, ज्यामुळे कंपनीची विक्री चांगलीच वाढली आहे. नुकताच मागील महिन्यातील म्हणजेच सप्टेंबर 2024 मधील कंपनीचा बाईक सेल्स रिपोर्ट जारी करण्यात आला. चला जाणून घेऊया, सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीने बाइक्सचे किती युनिट्स विकले आहे.
Hero Motocorp ने सप्टेंबर 2024 मध्ये देशभरात 637050 युनिट्सची विक्री केली आहे. याआधी, मागच्या वर्षी याच कालावधीत सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने 536499 युनिट्सची विक्री केली होती.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बाजारात सर्वाधिक मागणी 100 आणि 125 सीसी सेगमेंटच्या बाईक्सना आहे. यासोबतच प्रिमियम सेगमेंटच्या बाईक्सला सुद्धा बाजारात चांगली मागणी आहे.
Hero MotoCorp च्या म्हणण्यानुसार, कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय बाजारात 616706 युनिट्स विकल्या आहेत. यासह, कंपनीने गेल्या महिन्यात 20344 युनिट्सची निर्यात केली आहे. तर गेल्या वर्षी देशांतर्गत बाजारात 519789 मोटारींची विक्री झाली होती तर 16710 मोटारींची निर्यात झाली होती.
Hero MotoCorp प्रीमियम सेगमेंटमध्ये एंट्री लेव्हल बाईक्स तसेच नॉर्मल बाईक्स ऑफर करते. यासोबतच कंपनी स्कूटरची विक्रीही करते. ज्यामध्ये Speldor+ Xtec, Speldor+, HF Dlx, HF 100, Glamour, Passion+, Glamour सारख्या बाईक्सचा समावेश आहे. तर स्कूटर सेगमेंटमध्ये, कंपनी Xoom, Destini Prime, Pleasure+ Xtec, Destini 125 Xtec सारख्या स्कूटर ऑफर करते. 125 सीसी प्रीमियम स्कूटर सेगमेंटमध्ये, कंपनी ऑक्टोबर महिन्यात नवीन Destini 125 च्या किमती जाहीर करू शकते.