फोटो सौजन्य- Official Website
ह्युंदाई मोटर्स इंडिया (Hyundai Motor India) ने Alcazar या बहुप्रतिक्षित कार 9 सप्टेंबर रोजी लॉंच केली जाणार आहे दरम्यान कंपनीकडून या कारचे चे फेसलिफ्ट प्रदर्शित केले आहे. या नवीन Alcazar चे बुकिंग संपूर्ण भारतात 25,000 रुपया मध्ये सुरू झाले आहे. हुंदाई अल्काझारमध्ये 6 आणि 7-सीट प्रकारांसह चार ट्रिम पर्याय उपलब्ध असणार आहेत. एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टिज, प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशा चार प्रकारात कार उपलब्ध असेल. नवीन Alcazar भारतातील Mahindra XUV700 आणि Tata Safari यांच्याशी स्पर्धा करणार आहे. त्यामुळे या मॉडेलमुळे ग्राहकांना चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
हे देखील वाचा-या दमदार फीचर्ससह लाँच झाली TVS Jupiter 110, जाणून घ्या किंमत आणि बरंच काही
अल्काझार डिझाइनच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अपडेट आहेत. कारचे पुढचे टोक हे क्रेटासारखे दिसत आहे. नवीन आयताकृती लोखंडी जाळीसह, क्वाड-बीम LED हेडलाइट्स आणि H-आकाराचे DRLs, जे LED बारच्या द्वारे जोडलेले आहेत. या कारच्या फ्रंट बंपरसह फ्रंट हूड डिझाइन देखील नवीन वाटत आहे. नवीन क्रिझसह आणि अलॉय व्हीलसाठी नवीन डिझाइन दिसत असून कारच्या प्रोफाइलमध्ये काही बदल देखील दिसत आहे
कारची वैशिष्ट्ये
ह्युंदाईच्या या नव्या कारमध्ये पूर्वीपेक्षा अधिक वैशिष्ट्ये मिळू शकतात, विशेष करुन टॉप-स्पेक मॉडेल्सवर. लेव्हल 2 ADAS वैशिष्ट्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. ही कार तीन-रो SUV 1.5-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येईल, ज्यामध्ये पेट्रोलसाठी 7-स्पीड ड्युअल-क्लच आणि डिझेलसाठी 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहे. या वैशिष्ट्यांमुळे कारचा दर्जा आणि गुणवत्ता वाढणार आहे.
हे देखील वाचा-अखेर भारतात Audi Q8 झाली लाँच, जाणून घ्या किंमत आणि अन्य फीचर्स
कार नऊ रंगात होणार उपलब्ध
ह्युंदाई कार ही नवीन रोबस्ट एमराल्ड मॅटसह तब्बल नऊ रंग पर्याय ऑफर करेल. सध्याच्या Alcazar ची किंमत 16.78 लाख रुपये आणि 21.28 लाख रुपये(एक्स-शोरूम) आहे. सध्या विक्री होत असलेल्या मॉडेलच्या तुलनेत किमती वाढल्या जाण्याची जास्त शक्यता आहे. मात्र ग्राहकांना या SUV मुळे एक उत्तम पर्याय मिळणार आहे. 9 सप्टेंबरला या कारची संपुर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे.