Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Bayon च्या लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता, Panoramic Sunroofसह मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Hyundai Bayon: Hyundai ची आगामी Bayon SUV भारतात दाखल होण्याच्या तयारीत असून कंपनीने या SUV साठी बुकिंग सुरू केली आहे. Hyundaiच्या अधिकृत माहितीनुसार, बुकिंग ₹11,000 च्या प्रारंभिक रकमेसह वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपवर सुरू आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 26, 2026 | 12:20 PM
Hyundai Bayon च्या लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Hyundai Bayon च्या लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Hyundai Bayon New Teaser Released: Hyundai ने पुन्हा एकदा धमाका केली. या कंपनीची नवी कॉम्पॅक्ट SUV Bayon लवकरच भारतात आली असून येत्या ऑक्टोबर 2026 मध्ये ही गाडी लॉन्च होईल. तसेच सगळ्या डीलर कडे तिचं प्री-बुकिंग सुद्धा सुरू झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून या गाडीचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले, ही गाडी काही SUV साधी नसून 4.2 मीटर लांब, तसेच दिसायला प्रीमियम आणि फिचर्सचा खनिजा आहे. Hyundai Bayon

दिसायला कशी आहे?

कंपनीने Bayon ला एकदम फ्युचरिस्टिक लूक दिला असून समोरून बघितलं तर बोनटला भारी कटिंग आहे. सगळ्यात खास म्हणजे गाडीचे H-Edge LED DRLs. आजकाल सगळ्या गाड्यांमध्ये कनेक्टेड लाईट येतात, मात्र Hyundaiने वेगळीच डिझाईन आणली आहे. त्यामुळे रात्री रस्त्यावर ही गाडी लगेच ओळखू येईल.साईडने बघितलं तर ड्युअल टोनचे मोठे अलॉय व्हील, जाड क्लॅडिंग आणि वर रूफ रेल्स दिल्या आहेत. त्यामुळे गाडी एकदम दमदार आणि बोल्ड वाटते.मागच्या बाजूला पण H-Edge टेललाईट, मोठा स्पॉयलर आणि वरच्या बाजूला LED स्टॉप लॅम्प दिला आहे. एकंदरीत गाडी बाहेरून खूपच प्रीमियम दिसत असली तरी

आतमध्ये बसलं की वेगळीच दुनिया

बाहेरून मोठी आहेच पण आतमध्ये पण खूप जागा आहे. 4.2 मीटर लांबी असल्यामुळे लेगरूम, हेडरूम सगळं भरपूर मिळतं. पाच जण आरामात बसू शकतात. आतमध्ये सगळ्यात मोठा धमाका म्हणजे Generative AI व्हॉईस असिस्टंट. म्हणजे तुम्ही गाडीशी बोलू शकता, ती तुम्हाला उत्तर देईल. ही गाडी आता नुसती गाडी नाही तर इंटेलिजेंट वाहन झाली आहे.

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

फिचर्स काय आहेत?

  • या गाडीत फिचर्सची लिस्ट खूप मोठी आहे. मोठा पॅनोरॅमिक सनरूफ आहे, पूर्ण छत उघडतं.
  • सीटला व्हेंटिलेशन दिलं आहे, म्हणजे उन्हाळ्यात सीट गरम होणार नाही, थंड हवा येईल.
  • लेदरच्या सारखं प्रीमियम कव्हर.
  • 360 डिग्री कॅमेरा, गाडी पार्क करायला एकदम सोपं.
  • पुढच्या दोन्ही सीट इलेक्ट्रिकली ऍडजस्ट होतात.
  • ऑटोमॅटिक AC पण आहे.

इंजिन आणि CNG चा मोठा धमाका

Bayon मध्ये 1.5 लिटरचं नैसर्गिक पेट्रोल इंजिन येणार आहे. यात तुम्हाला मॅन्युअल आणि IVT ऑटोमॅटिक असे दोन्ही ऑप्शन मिळतील.पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यात कंपनी फिटेड CNG पण देणार आहे. 4 मीटर पेक्षा मोठ्या SUV मध्ये Hyundai पहिल्यांदाच मॅन्युअल सोबत फॅक्टरी फिटेड ड्युअल CNG किट देतेय. भारी गोष्ट म्हणजे CNG टाकी खाली बसवली आहे, त्यामुळे मागे डिक्कीची जागा कमी होणार नाही. हे तर खूपच भारी आहे.

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

सेफ्टी मध्ये 5 स्टार

सेफ्टी बद्दल Hyundai ने काहीच कमी ठेवलं नाही. या गाडीत 6 एअरबॅग तर सगळ्या मॉडेलमध्ये असणारच आहेत. ही गाडी Global K Enhanced प्लॅटफॉर्म वर बनवली आहे.कंपनीचा दावा आहे की भारत NCAP च्या टेस्ट मध्ये या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळेल. आणि त्यासोबत लेव्हल 2 ADAS पण येणार आहे. म्हणजे गाडी स्वतःहून ब्रेक लावेल, लेन मध्ये ठेवेल, अपघातापासून वाचवेल.

एकंदरीत बघायला गेलं तर Bayon ही फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट SUV असणार आहे. लूक भारी, फिचर्स भारी, पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्याय आणि सेफ्टी पण 5 स्टार. ऑक्टोबर मध्ये लॉन्च झाल्यावर ही गाडी बाजारात नक्कीच धुमाकूळ घालेल.

Web Title: Hyundai bayon 2026 launch booking features ai sunroof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Hyundai
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
1

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

ह्युंदाई BAYON चे भारतात बुकिंग सुरू; फक्त ₹11,000 मध्ये करा बुकिंग! लाँचआधीच मोठी तयारी
2

ह्युंदाई BAYON चे भारतात बुकिंग सुरू; फक्त ₹11,000 मध्ये करा बुकिंग! लाँचआधीच मोठी तयारी

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
3

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर
4

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.