
Hyundai Cars Sales Rise By 17% In October 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतातील Hyundai Sales October 2026 चे आकडे समोर आले असून, ह्युंदाई मोटर इंडियाने ऑक्टोबर महिन्यात चांगलीच वाढ नोंदवली आहे. कंपनीने या महिन्यात एकूण 62,799 कार्सची विक्री केली. मागच्या वर्षी ऑक्टोबर 2025 मध्ये हाच आकडा 53,792 युनिट्स होता. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 17% वाढ झाली आहे. एसयूव्ही मॉडेल्सचा कंपनीच्या विक्रीत मोठा वाटा राहिला.
क्रेटा ठरली कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार
ह्युंदाई क्रेटाने ऑक्टोबर 2026 मध्ये 17,955 युनिट्सची विक्री करत कंपनीच्या लिस्टमध्ये पहिले स्थान कायम ठेवले. पण मागच्या वर्षीच्या 18,381 युनिट्सच्या तुलनेत तिच्या विक्रीत 2% घट झाली. दुसरीकडे, ह्युंदाई व्हेन्यूने 13,017 युनिट्सची विक्री केली. मागच्या वर्षीच्या 11,738 युनिट्सच्या तुलनेत व्हेन्यूच्या विक्रीत 11% वाढ झाली.
ह्युंदाई एक्स्टरने 8,509 युनिट्सची विक्री नोंदवत तिसरे स्थान मिळवले. मागच्या वर्षी याच महिन्यात 6,294 युनिट्सची विक्री झाली होती. यामुळे एक्स्टरच्या विक्रीत 35% वाढ झाली. तसेच ह्युंदाई ऑराने 7,349 युनिट्सची विक्री केली असून, तिच्या विक्रीत 26% वाढ झाली आहे.
नवीन ह्युंदाई क्रेटा टेस्टिंगदरम्यान दिसली; बॉक्सी डिझाइन, ADAS आणि हायब्रिड इंजिनची मिळणार साथ!
i20 आणि ग्रँड i10ची विक्री कशी राहिली?
ह्युंदाई आय20ने कंपनीच्या सर्व मॉडेल्समध्ये सर्वाधिक 37% वार्षिक वाढ नोंदवली. ऑक्टोबरमध्ये या कारच्या 5,528 युनिट्सची विक्री झाली. मागच्या वर्षी हा आकडा 4,023 युनिट्स होता. तर ग्रँड आय10च्या 5,458 युनिट्सची विक्री झाली. तिच्या विक्रीत 1% वाढ झाली आहे.
कंपनीने 26 ऑक्टोबरला लाँच केलेल्या ह्युंदाई बायॉनने 3,449 युनिट्सची विक्री नोंदवली. तर व्हर्नाची विक्री 775 युनिट्सवर राहिली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यात 6% घट झाली.
अल्काझार आणि आयोनिक 5 ची विक्री घसरली
ह्युंदाई अल्काझारच्या विक्रीत मोठी घट झाली. ऑक्टोबरमध्ये केवळ 758 युनिट्सची विक्री झाली, जी मागच्या वर्षीच्या 1,259 युनिट्सच्या तुलनेत 40% कमी आहे. दुसरीकडे, ह्युंदाई आयोनिक 5 ची केवळ 1 युनिट विकली गेली. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 6 युनिट्सची विक्री झाली होती. तर ह्युंदाई टक्सॉनची ऑक्टोबर 2026 मधील विक्री नोंदवली गेली नाही.
एकूण आकडे पाहता, क्रेटा आणि व्हेन्यूने ह्युंदाईच्या विक्रीला मोठा आधार दिला. आय20, एक्स्टर आणि ऑरा यांची वाढही कंपनीसाठी सकारात्मक ठरली. पण अल्काझार आणि आयोनिक 5 सारख्या मॉडेल्सची घसरलेली विक्री कंपनीसमोर वेगळे आव्हान उभे करते.
Ans: ह्युंदाई मोटर इंडियाने ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण 62,799 कार्सची विक्री केली. मागच्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत 17% वाढ झाली.
Ans: ह्युंदाई क्रेटा ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. तिच्या एकूण 17,955 युनिट्सची विक्री झाली.
Ans: ह्युंदाई आय20च्या विक्रीत सर्वाधिक 37% वार्षिक वाढ झाली. ऑक्टोबर 2026 मध्ये या कारच्या 5,528 युनिट्सची विक्री झाली.