
फोटो सौजन्य - Social Media
Hyundai 2025 Auto Show USA (United States of America)च्या लॉस एंजेलज या शहरात आयोजित करण्यात आले होते. या Auto Show दरम्यान Hyundai ने त्यांची नवीन आगामी गाडीच्या Look चे अनावरण केले आहे. तसेच या कॉन्सेप्टचे नाव Hyundai Crater असे देण्यात आले आहे. ही गाडी पाहायला रणगाड्याचा भास देत आहे. एकंदरीत, ह्युंदाईने 2025 लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये नवी कॉन्सेप्ट SUV ‘क्रेटर’चे अनावरण केले, जी भविष्यातील एक्सआरटी-बॅज्ड साहसी इलेक्ट्रिक SUV सिरीजची झलक दाखवते.
या SUV चे वैशिष्ट्य म्हणजे या गाडीचे डिझाईन ‘आर्ट ऑफ स्टील’ फिलॉसफीवर आधारित आहे. या गाडीला तीक्ष्ण असे बॉडी लाईन्स आहेत. मस्क्युलर प्रोफाइल असणारी ही SUV भविष्यात बाजारात धमाल करणारच आहे याची शाश्वत ग्वाही स्वतः Hyundai Crater चे उत्कृष्ट फीचर्स देत आहेत. भविष्यात येणाऱ्या EV SUV मध्ये हा कॉन्सेप्ट काही हटके ठरेल असे दिसून येत आहे. कारण या Off Roading कॉन्सेप्टला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
फीचर्स लक्षात घेतले तर Hyundai Crater या नव्या कॉन्सेप्टला १८-इंचाची चाके, ३३-इंच ऑल-टेरेन टायर्स, जड बॉडी क्लॅडिंग, रूफ रॅकवरील पिक्सेल-स्टाईल लाइट्स आणि फ्रंट स्किड प्लेटमध्ये दिलेला बिल्ट-इन बॉटल ओपनर अशा निरनिरळ्या वैशिष्ट्यांनी नटवण्यात तसेच सजवण्यात आले आहे.