डुकाटीने लॉंच केली नवीन बाईक (फोटो- ducati)
डुकाटीने लॉंच केले Streetfighter चे नवीन व्हर्जन
या मोटरसायकलमध्ये मिळणार अनेक खास फीचर्स
मोटरसायकल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी
भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन दुचाकी गाड्या लॉंच केल्या जातात. प्रत्येक ऑटोमोबाइल कंपनी आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करते. डुकाटी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन बाईक भारतीय बाजारपेठेत आणली आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक फीचर्स आणि जबरदस्त इंजिन पाहायला मिळणार आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत आणि याची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात.
डुकाटी कंपनीने भारतीय बाजारपेठेत Streetfighter V2 व्हर्जन 2025 लॉंच केले आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक पैनी गिल V2 मॉडेल लॉंच केले आहे आहे. यामध्ये दोन व्हेरीएन्ट लॉंच करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
काय असणार फीचर्स?
डुकाटी कंपनीने या नवीन व्हर्जनमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, क्विक शिफ्टर, रेस, स्पोर्ट, रायडिंग मोड, लॉंच कंट्रोल, एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 890 सीसी क्षमतेचे इंजिन असणार आहे. यामध्ये 120 हॉर्स पॉवरसह 93.3 न्यूटन मीटर टॅार्क मिळतो. याधीच्या इंजिनमध्ये 955 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे.
किती आहे किंमत?
डुकाटी कंपनीने या नवीन व्हर्जनमध्ये दोन व्हेरीएन्ट लॉंच केले आहेत. याच्या बेस व्हेरीएन्टची किंमत 17.50 लाख रुपये असणार आहे. तर टॉप व्हेरीएन्टची किंमत 19.49 लाख रुपये असणार आहे.
धुक्यात वाहन चालवताना कशी काळजी घ्याल?
धुक्यात वाहन चालवताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गाडीचा वेग नियंत्रित ठेवणे. पहाटे किंवा रात्री धुके अधिक दाट असते, ज्यामुळे समोरचा रस्ता नीट दिसत नाही. अशा वेळी वेग कमी ठेवल्यास अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास वाहनावरील नियंत्रण सोपे राहते. सामान्यतः समोर असलेल्या वाहनापासून किमान १०० मीटर अंतर राखणे सुरक्षित मानले जाते.
तसेच धुक्यात विनाकारण लेन बदलणे टाळावे. लेन बदलताना अचानक समोरून वाहन येण्याची शक्यता अधिक असते. विजिबिलिटी कमी असल्याने दुसऱ्या वाहनाचा वेग आणि त्याचे अंतर अचूक मोजणे कठीण जाते. त्यामुळे तुमच्या लेनमध्येच राहणे हे सुरक्षित पर्याय असते.
Safe Driving Tips :- धुक्यात वाहन चालवताना कशी काळजी घ्याल- सुरक्षा टिप्स जाणून घ्या !
धुक्यात गाडी चालवताना येलो लाईटचा वापर फायदेशीर ठरतो. पांढरा प्रकाश धुक्यात परावर्तित होऊन दृष्टी आडवतो, तर येलो लाईट धुक्यातील दृश्यमानता वाढवतो. जर वाहनात येलो लाईट नसतील तर हेडलाइट्सवर येलो ट्रान्सपेरेंट शीट बसवू शकता. अनेक चालक धुक्यात गाडी चालवताना हाय बीमचा वापर करतात, पण ही अत्यंत चुकीची सवय आहे. हाय बीममुळे समोरचा रस्ता अजून धूसर दिसतो.






