Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या EV क्षेत्रामध्ये ‘या’ देशाचे असू शकते राज्य; ग्लोबल ट्रेंड अहवालामध्ये माहिती आली समोर

जगातील तिसरी मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ असणाऱ्या भारतावर जागतिक कंपन्यांचे लक्ष आहे. विशेषत: एक देश भारतीय इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रावर लक्ष ठेऊन आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 17, 2024 | 03:24 AM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

सध्या जागतिक ऑटोमोबाईल उद्योग एका मोठ्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. इंधनावर चालणाऱ्या गाड्यांच्या जागी  आता इलेक्ट्रीक गाड्यांना प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या इलेक्ट्रीक गाड्या निर्मितीवर भर देत आहेत. भारतामध्येही इलेक्ट्रीक कार्स, स्कूटर, बाईकच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगातील तिसरी मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ असणाऱ्या भारतावर जागतिक कंपन्यांचे लक्ष आहे. विशेषत: चीनी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत जास्त रस आहे.

येत्या काही दिवसातच  भारतामध्ये स्वस्त चायनीज इलेक्ट्रिक कार्सचा ओघ दिसू शकतो. याचे कारण  ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) च्या अहवालानुसार, पाश्चिमात्य देशांमध्ये चिनी ऑटोमोबाईल उत्पादनांविरोधात व्यापारात अडथळे येत आहेत. जीटीआरआयच्या  या अहवालामध्ये असे नमूद केले आहे की ईव्हीची  80 टक्के उत्पादनांत  चीनमध्ये उत्पादित केलेल्या बॅटरी आणि घटकांचा समावेश असतो. त्यामुळे भारतातील वाढत्या ईव्ही उत्पादन क्षेत्रात चिनी पुरवठादार महत्वाचे ठरणार आहे.

पाश्चिमात्य देशात वाढले चीनी इव्ही वाहनांवरील शुल्क

या वर्षी म्हणजे 2024 च्या मे महिन्यात अमेरिकेने चिनी इलेक्ट्रिक वाहनांवरील शुल्क 25 टक्क्यांवरून 100 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​होते. तर, कॅनडाने 100 टक्के शुल्क वाढवले ​​आणि स्टील आणि ॲल्युमिनियमच्या चीनी आयातीवर 25 टक्के शुल्क लावले. युरोपियन युनियनेही चीनी उत्पादनावर शुल्क वाढ केली होती.

येत्या काही वर्षांत चिनी वाहनांचा पूर येऊ शकतो

पाश्चिमात्य देशांमध्ये उत्पादन शुलक् वाढले आहे त्यामुळे चीनी उत्पादनांचा मोर्चा भारतीय बाजारपेठेकडे वळला आहे. येत्या काही वर्षांत चिनी ईव्ही भारतीय बाजारपेठेत पूर येण्याची अपेक्षा आहे. चीनची SAIC मोटर (एमजी ब्रँडचे मालक) आणि भारताचा JSW समूह यांच्यात भागीदारी झाली आहे, या भागीदारीचे  2030 पर्यंत दहा लाखांहून अधिक नवीन वाहने विकण्याचे उद्दिष्ट आहे.

भारताने या क्षेत्रात करावी गुंतवणूक

यासोबतच, जीटीआरआयच्या अहवालात असेही म्हटले आहे की, प्रगत बॅटरी तंत्रज्ञानासाठी सॉलिड-स्टेट बॅटरी आणि हायड्रोजन इंधन सेलसाठी भारताने संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करावी.

याशिवाय, मजबूत बॅटरी रिसायकलिंग आणि ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांना समर्थन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ईव्ही उत्पादनाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी, जीटीआरआयने ईव्ही उत्पादन आणि विल्हेवाट संबंधित पर्यावरणीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जगामध्ये इलेक्ट्रीक वाहने वाढणार असल्याने त्यासंबंधी विविध मुद्दे या अहवालात मांडले आहेत.

Web Title: In indias ev sector can be a dominated by china the information came out in the global trends report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 03:24 AM

Topics:  

  • China
  • india

संबंधित बातम्या

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?
1

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
2

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
3

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल
4

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.