फोटो सौजन्य: iStock
भारतात खूप मोठ्या प्रमाणात कार्सची विक्री होत असते. यात लक्झरी कार्सपासून ते बजेट फ्रेंडली कार्सपर्यंतचा समावेश असतो. काळानुसार अनेक ऑटो कंपनीज आपल्या कार्समध्ये अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट करत आहे, जेणेकरून ग्राहकांचा रायडिंग अनुभव हा अधिक चांगला होऊ शकेल.
सध्या मार्केटमध्ये अनेक कार्स ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणाऱ्या कार्स लाँच होत आहे. यात चालकाशिवाय कारमधील गिअर्स ऑटोमॅटिक बदलले जातात. परंतु आजही अनेक जण मॅन्युअल पद्धतीने कारला चालवणे पसंत करत असतात. पण हल्लीच्या आधुनिक युगात, मॅन्युअल कार चालवणे खरचं फायद्याचे आहे का? चला जाणून घेऊया.
MG च्या ‘या’ कारमुळे कंपनीचे नशीब पालटले, विकल्या तब्बल 6 हजार कार्स
भारतात मोठ्या प्रमाणात कार वापरल्या जातात. यातील बहुतांश कार मॅन्युअल ट्रान्समिशनचा वापर करतात. पण आजच्या काळात, या प्रकारच्या ट्रान्समिशनसह आलेल्या कार चालवण्याचे काय फायदे आहेत? ऑटोमॅटिक ट्रान्समिशनपेक्षा या कार्स कशा चांगल्या असतात, याबद्दल आपण जाणून घेऊया.
भारतात वापरल्या जाणाऱ्या बहुतेक कार मॅन्युअल ट्रान्समिशन असतात. भारतीयांना या प्रकारच्या ट्रान्समिशन असलेल्या कार खूप आवडतात. अनेक कारणांमुळे, देशात मॅन्युअल ट्रान्समिशन वापरले जाते.
मॅन्युअल कार भारतात अधिक लोकप्रिय आहेत कारण अनेक जणांनी लहानपणापासून मॅन्युअल ट्रान्समिशन कारमध्ये प्रवास केला आहे. अशा कारमध्ये गिअर्स कसे बदलले जातात हे देखील प्रत्येकाला माहित असते.
‘या’ एक फिचरचा वापर आणि मुजोर कॅब ड्रायव्हर होईल सुतासारखा सरळ
मॅन्युअल ट्रान्समिशन कारला प्राधान्य देण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे काहीवेळा तुम्हाला कार चालवताना झटपट पॉवर लागते. अशा परिस्थितीत, मॅन्युअल ट्रान्समिशनने, कारचे गिअर्स गरजेनुसार बदलले जाऊ शकते आणि इंजिनची शक्ती सहजपणे वाढवता किंवा कमी केली जाऊ शकते. त्यामुळे गरजेच्या वेळी जास्त पॉवर घेता येऊ शकते.
वापरण्यास सोप्या असण्याव्यतिरिक्त, मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारला पसंत करण्याचे अजून एक कारण दिले जाते ते म्हणजे या कारमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आढळल्यास ते दूर करणे अगदी सोपे असते. यासोबतच त्यांची दुरुस्ती आणि देखभालीचा खर्चही कमी होतो. त्याच वेळी, मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली कार प्रवासादरम्यान खराब झाल्यास, सर्व्हिस सेंटरऐवजी कोणत्याही मेकॅनिकद्वारे ते तपासले जाऊ शकते.
मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारची किंमत देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारपेक्षा खूपच कमी असते. त्यामुळे कार खरेदीचा खर्च देखील कमी होतो. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येणाऱ्या कार्सची किंमत खूपच जास्त असते. त्यामुळेच देशातील बहुतांश लोक कार खरेदी करताना मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार घेण्यास जास्त प्राधान्य देतात.