फोटो सौजन्य: iStock
हल्ली ऑनलाईन रायडींग प्लॅटफॉर्मचं वापर वाढला आहे. खासकरून शहरात, अनेक वापरकर्ते उबर, ओला, आणि अशा अनेक रायडींग प्लॅटफॉर्म्सचा वापर करताना दिसतात. यात कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपासून थोरांपर्यंतचा देखील समावेश आहे. अशावेळी अनेंक चुकीच्या घटना देखील कॅबमधे घडताना दिसतात. काही वेळेस कॅब ड्रॉयव्हर प्रवाशांशी नीट बोलत नाही यामुळेच अनेकदा दोघांमध्ये बाचाबाची होते.
सोशल मीडियावर तुम्ही अनेक असे व्हिडिओज पहिले असतील ज्यात कॅब ड्रायव्हर हा प्रवाशांसोबत शुल्लक कारणांमुळे भांडत असतो. अशावेळी महिला असो की पुरुष, प्रत्येकांना काही सेफ्टी फीचर्स ठाऊक असणे गरजेचे आहे.
आपल्या सुरक्षेबाबत प्रत्येकाच्या मनात तणाव हा कायम असतो. अशा परिस्थितीत जर एकट्याने कॅबने प्रवास करायचा असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अनुभव हा चांगला असेल असे नाही. त्यामुळे तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा कॅब ड्रायव्हर त्याच्या ॲप प्रोफाइलपेक्षा वेगळा दिसत असतो, राईड दरम्यान त्याचा त्रास होऊ शकतो अशा अनेक समस्यांना प्रत्येकाला कधी ना कधी सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा परिस्थितींपासून दूर राहण्याचे मार्ग प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजेत.
तुम्ही अनेकदा उबर कॅबने प्रवास करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा बेस्ट फिचरबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही क्वचितच वापर करत असाल. हे फिचर फक्त Uber कॅब अॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध असणार आहे, कंपनीने प्रवासी आणि रायडर्सच्या सुरक्षेसाठी Uber चे ऑडिओ रेकॉर्डिंग फीचर दिले आहे. या फीचरच्या माध्यमातून प्रवाशांचीच नव्हे तर रायडरचीही सुरक्षितता राखली जाणार आहे.
उंबर राइड सुरू होताच हे फीचर तुम्हाला दिसण्यास सुरुवात होईल, जेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल किंवा तुम्हाला राईडचा ऑडिओ रेकॉर्ड करणे महत्वाचे आहे असे वाटत असेल, तेव्हा तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करू शकता. हा पर्याय मॅपच्या उजव्या कोपऱ्यात दिसेल, यासाठी तुम्हाला निळ्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
निळ्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर, ऑडिओ रेकॉर्डिंग चालू करा. आता तुमच्या संपूर्ण राइडचा ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू होईल. तुमच्या आणि ड्रायव्हरमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही आवाज येत असतील ते सर्व या फीचरच्या मदतीने रेकॉर्ड होतील.
जवळपास सर्व ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला रिपोर्ट आणि हेल्पचा पर्याय मिळतो. या फीचर्सद्वारे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. हे काम करत नसल्यास, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून कंपनीचा ईमेल आयडी मिळवून तुम्ही कंपनीला मेल देखील करू शकता.